वाशू भगनानी यांचे प्रॉडक्शन हाउस पूजा एंटरटेनमेंटवर कर्ज असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या बॉक्स ऑफिसवरील अपयशानंतर थकबाकी न भरणं आणि ऑफिसची इमारत विकणं या चर्चांवर आता वाशू भगनानी यांनी मौन सोडलं आहे. आपण अनेक वर्षांपासून एकाच टीमबरोबर काम करत असून त्यांची आजपर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही, असं वाशू भगनानी यांनी म्हटलं आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना वाशू म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून या व्यवसायात आहे. आमच्यावर थकबाकी आहेत, असा दावा करणाऱ्या लोकांनी पुढे यावं आणि आमच्याशी बोलावं. त्यांनी पूजा एंटरटेनमेंटशी करार केला आहे का? त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे का? सोशल मीडियावर वक्तव्ये करण्यापेक्षा या गोष्टी सोडवण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. काही समस्या असेल तर आम्ही त्याचं निराकरण करू. कोणीही पळून जात नाहीये. कृपया माझ्या ऑफिसमध्ये या, आमच्याशी बोला, आम्हाला तुमची कागदपत्रे द्या आणि अडचण सोडवायला आम्हाला ६० दिवस द्या. मी कोणत्याही दबावाला किंवा ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. आम्ही यूकेमधील कंपन्यांबरोबरही काम करतो, त्यांच्याकडेही जर कुणाची थकबाकी असेल तर त्यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधा.”

devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : “शिवसेनेतल्या राजकारणाला कंटाळून मी…”, राज ठाकरेंनी सांगितला २४ वर्षांपूर्वीचा किस्सा
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
Tejaswini Pandit film Yek Number will be screened on october 10
तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचे १० ऑक्टोबरला प्रदर्शन
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Dilip Halyal, comedian Dilip Halyal,
ज्येष्ठ हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचे निधन

सोनाक्षी सिन्हाने लग्नात नेसली आईची साडी, तर रिसेप्शनच्या लाल बनारसी साडीची किंमत फक्त…

वाशू भगनानी हे आमदार धिरज देशमुखांचे सासरे आहेत. वाशू यांची मुलगी दिपशिखा ही धिरज देशमुखांची पत्नी आहे. दरम्यान, २५० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी ऑफिसची जागा विकल्याच्या अफवा वाशू भगनानी यांनी फेटाळून लावल्या. ऑफिसच्या जागेचं रिडेव्हलपमेंट सुरू असल्याने ऑफिस दुसरीकडे हलवल्याचं त्यांनी सांगितलं. याचं नियोजन वर्षभरापूर्वी करण्यात आलं होतं. आता ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ रिलीज झाल्याने हे काम सुरू करण्यात आलं आहे. हिट आणि फ्लॉप या व्यवसायाचा एक भाग आहे आणि आता आपण पुढच्या प्रकल्पावर काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

सोनाक्षी-झहीरच्या आंतरधर्मीय लग्नाविरोधात मोर्चे अन् ट्रोलिंग; शत्रुघ्न सिन्हा उत्तर देत म्हणाले, “माझ्या मुलीने…”

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ बॉक्स ऑफिसवर अपयशी झाल्याने कंपनीने कर्मचारी कमी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. जवळपास ३५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने फक्त ५९.१७ कोटी कमाई केली होती. याशिवाय वाशू भगनानी यांची निर्मिती असलेले ‘बेल बॉटम’, ‘मिशन राणीगंज’ बॉक्स ऑफिसवर आदळले. टायगर श्रॉफचा बिग बजेट ‘गणपत’ देखील फ्लॉप ठरला. डील झाल्यावरही नेटफ्लिक्सने हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला, त्यामुळे या कर्जात भर पडत गेली, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. मात्र वाशू भगनानी या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.