निर्माते वाशू भगनानी यांनी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा सिनेमा तब्बल ३५० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला. या चित्रपटाची रिलीजपूर्वी खूप चर्चा होती, पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सपशेल आदळला. सिनेमा फ्लॉप झाल्याने भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंट प्रॉडक्शन हाऊसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या चित्रपटामुळे जे नुकसान झालं त्याचे २५० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी वाशू भगनानी यांनी मुंबईतील ऑफिस विकल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक तोट्यामुळे त्यांनी प्रॉडक्शन हाऊसने कर्मचारी कमी केले आहे. त्यांनी जवळपास ८० टक्के लोकांना कामावरून काढलं आहे. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, मोठं ऑफिस विकल्यानंतर आता मुंबईतील दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये ऑफिस बनवण्यात आलं आहे. मात्र अद्याप प्रॉडक्शन हाऊसने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाचव्या वर्षी पदार्पण, १८ व्या वर्षी स्वतःचा ब्रँड केला लाँच; २० व्या वर्षी अभिनेत्री घर, कार अन् कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण

“हे सर्व २०२१ मध्ये करोनाच्या साथीनंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या हिंदी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘बेल बॉटम’पासून सुरू झालं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर ‘मिशन राणीगंज’ही सपशेल आदळला. त्यानंतर टायगर श्रॉफचा बिग बजेट ‘गणपत’देखील फ्लॉप ठरला. इतकंच नाही तर डील झाल्यावरही नेटफ्लिक्सने हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला, त्यामुळे या कर्जात भर पडत गेली. मग प्रॉडक्शन हाऊसने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये गुंतवणूक केली, हा चित्रपट हिट झाल्यास परिस्थिती सुधारेल अशी आशा भगनानी यांना होती. पण चित्रपट फ्लॉप झाला आणि त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर आणखी वाढला. आता हे कर्ज फेडण्यासाठी वाशू यांच्याकडे ऑफिस विकण्याशिवाय पर्याय नव्हता,” असं वृत्त ‘बॉलीवूड हंगामा’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड’ने आठव्या दिवशी कमावले १७ लाख रुपये, सिनेमाचे एकूण कलेक्शन…

१९८६ मध्ये पूजा एंटरटेनमेंटची स्थापना करण्यात आली. या प्रॉडक्शन हाऊसने आजपर्यंत सुमारे ४० चित्रपटांची निर्मिती केली आहे. कंपनीने डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘कुली नंबर १’, ‘हिरो नंबर १’, ‘बीवी नंबर १’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘रहना है तेरे दिल में’ आणि ‘ओम जय जगदीश’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली. पण अलीकडचे काही सिनेमे फ्लॉप झाल्याने कंपनी कर्जात बुडाली आहे.

‘मिर्झापूर’ मधील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री रसिका दुग्गल म्हणाली, “रिहर्सलच्या वेळीच मला जाणवलं की…”

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर प्रॉडक्शन हाऊसला आणखी अडचणींचा सामना करावा लागला, ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करूनही हा चित्रपटाने फक्त ५९.१७ कोटी रुपये कमावले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न दिल्याचे आरोप पूजा एंटरटेनमेंटवर झाले होते.