वीर पहारियाने ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. वीरने अक्षय कुमारबरोबर ‘स्काय फोर्स’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर ९२ कोटींहून जास्त कमाई केली आहे. चित्रपटातील अभिनयासाठी वीरचं खूप कौतुक होत आहे. वीरच्या भावाची गर्लफ्रेंड जान्हवी कपूरही त्याच्यासाठी पोस्ट करत आहेत. जान्हवीबरोबर कसं बाँडिग आहे, याबद्दल वीरने माहिती दिली आहे.
अभिनेता वीर पहारिया आणि अक्षय कुमारचा चित्रपट ‘स्काय फोर्स’ खूप चर्चेत आहे. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. वीर पहारिया जोरदार प्रमोशन करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान वीर पहारिया जान्हवी कपूरबद्दल काय म्हणाला, ते जाणून घेऊयात.
जान्हवी कपूर वीर पहारियाचा भाऊ शिखर पहारियाला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात, फोटो शेअर करत असतात. जान्हवी वीरच्या आईबरोबर, शिखरबरोबर अनेकदा तिरुपती व सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला जाताना दिसते. जान्हवी शिखरबद्दल तिच्या भावना व्यक्त करत असते.
न्यूज 18 शी बोलताना वीरने जान्हवीचं कौतुक केलं. “जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या इंडस्ट्रीतील माझ्या पहिल्या ॲक्टर मैत्रिणी आहेत,” असं वीर म्हणाला. तसेच वीरने सांगितलं की त्याचं आणि जान्हवीचं नातं खूप चांगलं आहे. खुशी कपूरबरोबर अभिनयाच्या स्पर्धेबाबत वीर म्हणाला की तो नव्या पिढीकडे स्पर्धा म्हणून पाहत नाही. त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकायच्या व काम त्यांच्याबरोबर काम करायचं, असा त्याचा दृष्टीकोन आहे.
‘स्काय फोर्स’ चित्रपट दमदार कमाई करत आहे. वीर या यशाबद्दल म्हणाला, “मी अनेक दिवसांपासून नीट झोपलो नाहीये. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला ते दिसतंय की नाही हे मला माहीत नाही. पण मी खूप आनंदी आहे. मी खूप दिवसांपासून याची वाट पाहत होतो. स्काय फोर्सच्या या प्रवासाला ३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.”
‘स्काय फोर्स’चे कलेक्शन
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने रविवारी ३१.६० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचे भारतातील कलेक्शन ८६.४० व जगभरातील कलेक्शन ९२.९० कोटी रुपये झाले आहे.