Dharmendra Viral Video: बॉलीवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी जुने फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. एप्रिल महिन्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. तरीही देखील तितक्याच उत्साहाने धर्मेंद्र पापाराझींना म्हणत होते की, मी स्ट्राँग आहे. धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. नुकतेच त्यांनी असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे धर्मेंद्र चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचे हे व्हिडीओ पाहून नेटकरी कौतुक करत आहे.
धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. डोक्यावर टोपी घालून ते स्विमिंग पूलमध्ये व्यायाम करताना पाहायला मिळत आहेत. वयाच्या ८९व्या वर्षी तंदुरुस्त राहण्यासाठी धर्मेंद्र जोमात व्यायाम करत आहेत. धर्मेंद्र यांचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत.
धर्मेंद्र यांचे स्विमिंग पूलमधले व्हिडीओ पाहून लेक ईशा देओल आणि बॉबी देओलने प्रेम व्यक्त केलं आहे. त्यांच्या व्हिडीओवर ईशा व बॉबीने हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. तसंच चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “वाव…तुम्हाला असं फिट बघून खूप छान वाटतं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “क्या बात है पाजी.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहात, तुमचा आत्मविश्वास आणि जीवनशैली अनुकरण करण्यासारखी आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सलाम. चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुम्ही खरी प्रेरणा आहात.”
या व्हिडीओंआधी धर्मेंद्र यांनी सनी देओल आणि दिलीप कुमार यांचा जुना फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत लिहिलं होतं, ‘बेताब’ चित्रपटाच्या मुहूर्तावर दिलीप साहेबांचे प्रेमळ आशीर्वाद मिळण्याचे भाग्य सनीला लाभले. सनी देओल व दिलीप कुमार हा जुना फोटो खूप व्हायरल झाला होता.
दरम्यान, धर्मेंद्र ‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’ चित्रपटात शेवटचे पाहायला मिळाले होते. आता ते ‘इक्कीस’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करत आहेत. १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या एका बाप-लेकाच्या नात्याची कथा ‘इक्कीस’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अगस्त्य नंदाने या चित्रपटात अरुण खेत्रपालची भूमिका साकारली आहे. तर धर्मेंद्र त्याचे वडील एमएल खेत्रपाल या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.