ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे आज १५ मार्च रोजी निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेतील खोपडी या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे. समीर खक्कर तब्बल ३८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत होते.

फक्त तब्बूबरोबर जास्त चित्रपट का करत आहेस? चाहत्याच्या प्रश्नाला अजय देवगणने दिलं उत्तर; म्हणाला, “तिच्या…”

actor Sudip Pandey died of heart attack
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, इंजिनिअरींग सोडून आलेला सिनेविश्वात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Iqbal Chagla passed away, Senior lawyer Iqbal Chagla,
ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांचे निधन
musician-singer Rahul Ghorpade passes away
प्रसिद्ध संगीतकार-गायक राहुल घोरपडे यांचे निधन
Abhinav, Raosaheb Gurav , Raosaheb Gurav passed away, loksatta news, pune,
‘अभिनव’चे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांचे निधन
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू
Irrfan khan friend NSD batchmates Alok Chatterjee passed away
इरफान खान यांच्या जयंंतीदिनी दुःखद बातमी, त्यांचे बॅचमेट व जवळचे मित्र अभिनेते आलोक चॅटर्जींचे निधन

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, समीर यांच्या पार्थिवावर आज बोरिवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मधल्या काळात समीर यांनी इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि ते अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते. नंतर, ते परत आले आणि त्यांनी काम सुरू केलं. समीर यांनी सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात काम केलं होतं. याशिवाय त्यांनी गुजराती नाटकांमध्येही भूमिका केल्या होत्या.

‘नाटू नाटू’ला Oscar मिळाल्याची जॅकलिन फर्नांडिसच्या मेकअप आर्टिस्टने उडवली खिल्ली; म्हणाला, “पैसे असतील तर काहीही…”

दरम्यान, अमेरिकेतून परतल्यानंतर आपण चांगल्या भूमिकांच्या शोधात असल्याचं त्यांनी एकदा म्हटलं होतं. “प्रत्येकजण कामाच्या शोधात असतो आणि मीही. आणि काम शोधणे म्हणजे कामासाठी विचारणे आणि नोकरीसाठी अर्ज करणे. अभिनेत्यांच्या बाबतीत, प्रत्येक चित्रपट किंवा शो हा रोजचा व्यायाम आहे. पण मी एक वाईट सेल्समन आहे. मला आशा आहे की जे लोक मला ओळखतात ते मला कामाची ऑफर देतील. मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. मला आयुष्यभर लोकांचे मनोरंजन करायचे आहे, मी अजून थकलेलो नाही,” असं समीर खक्कर म्हणाले होते.

सोहेल खानच्या घरी का झाली अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी? अनन्या पांडेचे काका आणि सलमानच्या भावाचं नातं काय?

समीर यांनी दूरदर्शनवर काही लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केलं होतं. ‘नुक्कड’, ‘मनोरंजन’, ‘सर्कस’, ‘नया नुक्कड’, ‘श्रीमान श्रीमती’ आणि ‘अदालत’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. सुरभी चंदना आणि नमित खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘संजीवनी’मध्ये ते अखेरचे दिसले होते.

Story img Loader