Tiku Talsania suffers heart attack : बॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट आली आहे. टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. ते सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

न्यूज18 ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय टिकू यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप कुटुंबातील कोणीही त्यांच्या प्रकृतीबद्दल अधिकृत अपडेट दिलेली नाही.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?

हेही वाचा – लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

टिकू तलसानिया त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी हिंदी, मराठी आणि गुजराती थिएटरमध्येही काम केले आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये विविधांगी भूमिका वठवणाऱ्या टिकू तलसानिया यांनी तब्बल २५० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी सिनेसृष्टीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. त्यांनी आमिर खानबरोबर ‘अंदाज अपना-अपना’ चित्रपटात आणि शाहरुख खानबरोबर ‘देवदास’ चित्रपटात काम केलं आहे. ते नुकतेच ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्येही होते.

हेही वाचा –बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”

टिकू तलसानिया हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी १९८४ मध्ये ‘ये जो है जिंदगी’ या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. टिकू तलसानिया ‘इश्क’, ‘जोडी नंबर 1’ आणि ‘पार्टनर’ सारख्या कॉमेडी क्लासिक्समधील जबरदस्त कॉमिक परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात.

हेही वाचा – ‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर

टिकू तलसानिया यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी ‘सजन रे फिर झुठ मत बोलो’, ‘ये चंदा कानून है’, ‘एक से बढकर एक’ आणि ‘जमाना बदल गया है’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

टिकू तलसानिया यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार लोकांना माहीत नाही. टिकू यांचे लग्न दीप्ती तलसानियाशी झाले आहे. या जोडप्याला दोन अपत्ये आहेत. टिकू तलसानिया यांचा मुलगा रोहन तलसानिया हा एक उत्कृष्ट गायक आहे तर त्यांची मुलगी शिखा तलसानिया अभिनेत्री आहे.

Story img Loader