७० च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री मुमताज खूप लोकप्रिय आहेत. आता त्या चित्रपटांमध्ये काम करत नसल्या तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्या अनेक विषयांवर आपली मतं मांडत असतात. मुमताज सध्या पाकिस्तानला गेल्या आहेत, तिथून त्यांनी काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.

मुमताज या व्हिडीओंमध्ये हाउस पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अनेक पाकिस्तानी कलाकार दिसत आहेत. त्यांनी पाकिस्तानी गायक गुलाम अली यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मुमताज यांनी अभिनेता फवाद खानची भेट घेतली. फवादबरोबरचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मुमताज यांनी गायक राहत फतेह अली खान यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

तसेच त्यांनी इतर काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात त्या हाऊस पार्टीचा आनंद घेताना दिसत आहेत.

या व्हिडीओंमध्ये अनेक पाकिस्तानी कलाकार व गायक दिसत आहेत. अशान खानच्या घरी ही हाऊस पार्टी झाली.

दरम्यान, मुमताज काही दिवसांपूर्वी झीनत अमान यांच्यावर टीका केल्यामुळे चर्चेत होत्या. झीनत यांनी तरुणांना लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. त्यावर स्वतःचं लग्न सांभाळता न आलेल्यांनी सल्ला देणं चांगलं वाटत नाही, असं मुमताज म्हणाल्या होत्या.

Story img Loader