हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील लोक पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र अभिनेते अनुपम खेर यांना धक्का बसला आहे.
ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक आणि अनुपम खेर हे एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. अनुपम खेर यांना सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांना धक्का बसला. त्यांनी ट्वीट करत आपल्या लाडक्या मित्राला श्रद्धांजली वाहिली.
आणखी वाचा : “तुम्हा सर्वांना…” सतीश कौशिक यांची शेवटची पोस्ट चर्चेत
“मला माहिती आहे की, मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे. पण ही गोष्ट आज मी जिवंत असताना माझा जीवलग मित्र सतीश कौशिक याच्यासाठी लिहिन, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. ४५ वर्षांच्या मैत्रीला अचानक मिळालेला पूर्णविराम. सतीश तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखे कधीच होणार नाही. ओम शांती”, असे ट्वीट अनुपम खेर यांनी केले आहे.
आणखी वाचा : Satish Kaushik Passes Away : प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन
दरम्यान सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनेक नेतेमंडळी, कलाकार ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं, हमारा दिल आपके पास है, मुझे कुछ कहना है, बधाई हो बधाई, तेरे नाम, क्योंकि, ढोल आणि कागजसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.
तर मिस्टर इंडिया, मोहब्बत, जलवा, राम लखन, जमाई राजा, अंदाज, मिस्टर और मिसेज खिलाड़ी, साजन चले ससुराल, दिवाना मस्ताना, परदेसी बाबू, बड़े मियां छोटे मियां, हसीना मान जाएगी, राजा जी, आ अब लौट चलें, हम आपके दिल में रहते हैं, चल मेरे भाई अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.