महानायक अमिताभ बच्चन यांची कारकीर्द घडवण्यात बऱ्याच दिग्दर्शकांचा हात आहे. रमेश सिप्पी, ऋषिकेश मुखर्जी, राकेश मेहरा, कादर खान. अशाच काही नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे राकेश कुमार. १०नोव्हेंबर रोजी याच दिग्दर्शकाने अखेरचा श्वास घेतला. अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतील काही उत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.
वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. राकेश कुमार यांचं निधन कर्करोगामुळे झालं असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी एक शोकसभा आयोजित केली आहे.
आणखी वाचा : “अरे मूर्खांनो…” कामाची पद्धत आणि व्यक्तशीरपणावरून टोमणे मारणाऱ्यांवर अक्षय कुमार वैतागला
आज म्हणजेच रविवारी १३ नोव्हेंबर रोजी ही शोकसभा मुंबईतील लोखंडवाला परिसरात आयोजित करण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीतील राकेश कुमार यांचं योगदान मोलाचं आहे. बरेच सेलिब्रिटी त्यांच्या या शोकसभेला हजर राहणार आहेत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
राकेश कुमार यांनी ‘खून पसीना’, ‘दो और दो पांच’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘याराना’ ‘दिल तुझको दिया’ अशा कित्येक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याबरोबरच त्यांनी काही चित्रपटात अभिनयदेखील केला आहे.