प्रसिद्ध निर्माते कुलजीत पाल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. मीडिया रीपोर्टनुसार रविवारी म्हणजेच २५ जून रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. कुलजीत पाल यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलजीत यांच्या मॅनेजर संजय बाजपेयीने सांगितल्याप्रमाणे गेले बरेच दिवस कुलजीत यांची तब्येत ठीक नव्हती. हृदयविकाराचा झटका आणि वाढतं वय यामुळेच त्यांचं निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कुलजीत यांनी ‘अर्थ’, ‘आज’, ‘परमात्मा’, ‘वासना’, ‘आशियाना’सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

आणखी वाचा : सलमान खानच्या घरची सून झाली असती पूजा भट्ट; नातं तुटायला भाईजानच होता कारणीभूत

२५ जूनला दुपारी १२ वाजता कुलजीत यांच्यावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीवर अंत्य संस्कार पार पडणार आहेत. कुलजीत यांच्या परिवाराकडून २९ जून रोजी शोकसभेचंही आयोजन करण्यात आलं आहे. कुलजीत पाल यांनी बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांना पहिला ब्रेक दिला होता. काही कारणास्तव त्यांचा तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.