शंकर-जयकिशनपासून विशाल आणि शेखरपर्यंत अनेक आघाडीच्या संगीतकारांबरोबर काम करणारे ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे निधन झाले आहे. आज २६ ऑगस्ट रोजी त्यांनी ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. देव यांचे पार्थिव घरी ज्युपिटर अपार्टमेंट, फोर्थ क्रॉस लेन, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, मुंबई इथे दुपारी २ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
देव कोहलींचे प्रवक्ते प्रीतम शर्मा यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं, “कोहली जी गेल्या काही महिन्यांपासून कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल होते, त्यांची तब्येत बरी नव्हती आणि शनिवारी सकाळी त्यांचे झोपेतच निधन झाले.” दरम्यान, जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा स्मशानभूमीत सायंकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन
देव कोहलीने ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘जुडवा २’, ‘मुसाफिर’, ‘शूट आउट अॅट लोखंडवाला’ आणि ‘टॅक्सी नंबर ९११’ यांसारख्या १०० हून अधिक हिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यांनी अनु मलिक, राम लक्ष्मण, आनंद राज आनंद, आनंद मिलिंद आणि इतरांसारख्या अनेक हिट संगीत दिग्दर्शकांसोबतही काम केले होते.