छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ (Chhaava) चित्रपट नुकताच १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) व अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. अनेक कलाकारांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक करत हा सिनेमा पाहण्याचे प्रेक्षकांना आवाहन केले आहे. आता चित्रपटाला मोठे यश मिळत असतानाच अभिनेता विकी कौशलच्या एका कृतीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विकी कौशलने घेतले भगवान शंकराचे दर्शन

सोशल मीडियावर अभिनेता विकी कौशलचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात जात भगवान शंकराचे आशीर्वाद घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने यावेळी काही विधीही पार पडल्याचे दिसत आहे. मंदिरात जाताना अभिनेता पारंपरिक कपड्यांमध्ये दिसला. त्याने कुर्ता घातल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

‘छावा’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्याने मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ‘छावा’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ट्रेड ॲनॅलिस्ट तरण आदर्शनुसार, चित्रपट प्रदर्शित झालेल्या आठवड्यात त्याने १२१.४३ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने १४५ कोटींची कमाई केली आहे.

‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास शिवाजी सावंत यांच्या छावा या कांदबरीवर हा सिनेमा आधारित आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. यामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका निभावली आहे. रश्मिका मंदानाने यामध्ये येसूबाईंची भूमिका निभावली आहे, तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे.

दरम्यान, चित्रपटाने सुरुवातीच्या तीन दिवसात मोठी कमाई केली आहे. मात्र, चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे दिसत आहे. आता ‘छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader