बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि विकी कौशल यांची जोडी लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशल आणि साराने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन चित्रपटाचे पोस्टर शेअर करीत याबाबत घोषणा केली आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘जरा हटके जरा बचके’ असे असून याचा ट्रेलर १५ मे सोमवारी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : ‘मदर्स डे’निमित्त प्रियांकाने केलेली पोस्ट चर्चेत, सासूबाईंना म्हणाली “तुम्ही तुमच्या मुलाला…”
सारा अली खान आणि विकी कौशल या नव्या जोडीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित होणार असून हा सिनेमा २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा केल्यावर विकी आणि साराने कॅप्शनमध्ये “रोमॅंटिक की ड्रामाटिक? तुम्हाला काय वाटते कशी असेल आमची कहाणी?” असा प्रश्न आपल्या चाहत्यांना विचारला आहे. यापूर्वी २ जूनला ‘जवान’ चित्रपट रिलीज होणार होता परंतु आता शाहरुखच्या जवानने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकल्याने आता विकी कौशल आणि साराचा ‘जरा हटके जरा बचके’ प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’फेम अदा शर्माचे ‘मराठी’ प्रेम चर्चेत; ‘मदर्स डे’निमित्त केली खास पोस्ट
विकी-साराने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, “विकी कौशल ज्या चित्रपटात मुख्य भूमिका करतो त्याची गाणी सुपरहिट होतात.”, तर अनेकांनी या विकी-साराच्या या नव्या जोडीला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी उत्सुकता दाखवत शुभेच्छा दिल्या आहेत.

विकी आणि साराचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. दरम्यान, विकी कौशलने मेघना गुलजारच्या राझी चित्रपटात साकारलेल्या भूमिकेला प्रचंड पसंती मिळाली होती. आता लवकरच पुन्हा एकदा मेघनाच्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटात विकी प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.