बॉलिवूडमधील सुपरहिट जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे विकी कौशल व कतरिना कैफ. डिसेंबर २०२१मध्ये या दोघांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. विकी व कतरिनाकडे आता एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे त्यांच्या प्रत्येक व्हिडीओ व फोटोंमधून दिसून येतं. दरम्यान या दोघांचा सुखाचा संसार सुरु असताना चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विकीला विचारण्यात आलेला प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
विकी व सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळत आहे. याच चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यानच एका पत्रकाराने विकीला त्याच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारला.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील जेठालालकडे खरंच आलिशान बंगला, महागड्या गाड्या आहेत का? अभिनेता म्हणतो, “मुंबईमध्ये…”
‘विरल भयानी’ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे विकीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. “आपल्या देशामध्ये लग्न म्हणजे सात जन्माचं बंधन आहे असं बोललं जातं. तू हे योग्य वाटतं का?. किंवा कतरिना कैफपेक्षा चांगली अभिनेत्री आवडली तर घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं तू करशील का?”. पत्रकाराने हा प्रश्न विचारल्यानंतर विकीला हसू अनावर झालं.
पाहा व्हिडीओ
विकी हसत म्हणाला, “मला नंतर घरीही जायचं आहे. मी अजूनही लहान आहे. मला मोठं होऊद्या. जन्मोजन्मीचं आमचं नातं आहे”. विकीच्या या उत्तराने सगळ्यांची मनं जिंकली. पण या प्रश्नानंतर मात्र त्याला हसू अनावर झालं होतं. विकी व कतरिनाचा एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. ते त्यांच्या कृतीमधून, वागण्यातून दिसून येतंच