बॉलीवूडमधील अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जाणारा विकी कौशल सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच त्याचा डंकी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेपेक्षा कमी करत असला तरी येत्या काळात डंकी रेकॉर्डतोड कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान विकी एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपने विकीच्या अकाउंटला फॉलो केले आहे.
हेही वाचा-
विकी कौशल हा इन्स्टाग्रामकडून फॉलो केला जाणारा पहिला बॉलीवूड स्टार बनला आहे. इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त फॉलो केले जाणारे खाते स्वतः इंस्टाग्रामचे आहे, इंस्टाग्रामच्या फॉलोअर्सची संख्या जवळपा, ६६५ दशलक्षांपेक्षा जास्त आहे. तर इंस्टाग्राम केवळ ८१ लोकांचे अकाउंट फॉलो करते. आता या यादीत विकी कौशलचेही नाव जोडले गेले आहे. विकी कौशलच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुमारे १७ मिलियन फॉलोअर्स आहेत तर तो केवळ ४१६ लोकांना फॉलो करतो.
विकीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले २०२३ हे वर्ष विकीसाठी चांगले गेल्याचे बघायला मिळाले. या वर्षात विकीचे अनेक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. १ डिसेंबरला विकीचा सॅम बहादूर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात विकीने फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकरली होती. नुकताच त्याचा डंकी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकीबरोबर शाहरुख खान, तापसी पन्नूची प्रमुख भूमिका होती. आता लवकरच त्याचा आनंद तिवारी दिग्दर्शित ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर तृप्ति डिमरी व फातिमा सना शेख झळकणार आहेत.