लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा'(Chhaava) चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित झाला आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. प्रदर्शित झाल्यापासून पाचव्या दिवशीसुद्धा ‘छावा’ चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचे दिसते. आता ‘छावा’ हा सिनेमा कसा तयार झाला, हे एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले आहे. हा व्हिडीओ छावा चित्रपटाची निर्माती कंपनी ‘मॅडॉक’ने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना विकी कौशललादेखील टॅग केले आहे.

छावा चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी विकी कौशलने काय तयारी केली?

मॅडॉक कंपनीने छावा चित्रपट कसा तयार झाला, शूटिंगदरम्यानचे काही व्हिडीओ, चित्रपटाचे शूटिंग करण्याआधी, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याआधी विकी कौशलने काय व कशी तयारी केली याबद्दल अधिक माहिती सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, विकी कौशलचा जीममधील व्हिडीओ, युद्धाच्या सीनच्या शूटिंगची तयारी, घोडेस्वारीचा सराव पाहायला मिळत आहे. विकी कौशलनेदेखील त्याचा अनुभव या व्हिडीओमध्ये सांगितल्याचे पाहायला मिळत आहे. तलवारी, काठी घेऊन कसे युद्धाच्या सीनचे शूटिंग करण्याआधी या विकी कौशलने नक्की काय व कशाप्रकारे तयारी केली, हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटामुळे जी शिस्त माझ्यामध्ये आली आहे, ती याआधी माझ्यात नव्हती असे अभिनेत्याने म्हटले आहे. या व्हिडीओच्या शेवटी विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत विकी कौशलचे कौतुक केले आहे. “भावा, तू संभाजी महाराज जगला आहेस”, “तुझे कष्ट पडद्यावर दिसत आहेत”, “हे फक्त विकी कौशलच करू शकतो”, “आम्हाला विकी कौशल दिसलाच नाही; आम्हाला फक्त छत्रपती संभाजी महाराज दिसले, हीच तुमच्या मेहनतीची खरी पोचपावती”, “लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे”, अशा अनेक कमेंट या चाहत्यांनी केल्या आहेत. विकी कौशलने ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

छावा चित्रपटात रश्मिका मंदानाने येसूबाईंची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील सर्वांच्याच भूमिकांना प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. आता पाच दिवसांत चित्रपटाने १७१.२८ कोटी रुपयांची कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader