अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कटरीना कैफ ही मनोरंजन सृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. ती दोघंही त्यांच्या केमिस्ट्रीमुळे नेहमीच चर्चेत असतात. तसाच प्रत्येक वेळी ते एकमेकांच्या कामांचंही भरभरून कौतुक करताना दिसतात. विकी हा कतरीनाच्या कामाचा चाहता आहे हे त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. आता त्याने कतरीनाच्या गाजलेल्या आयटम सॉंगवर ठेका धरला.

विकी सध्या त्याच्या आगामी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या दरम्यानच्या कार्यक्रमात त्याने कटरीना कैफच्या ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर नाच केला.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा

आणखी वाचा : “प्रेक्षक खूप हुशार झालेत आणि…” बॉलिवूड चित्रपट अयशस्वी होण्याबद्दल अजय देवगणचं मोठं वक्तव्य

विकीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे ‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा. या व्हिडिओमध्ये विकी भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी हिच्याबरोबर स्टेजवर उभा असलेला दिसत आहे. यावेळी त्याने ‘चिकनी चमेली’ या गाण्याची हुकअप स्टेप केली. अत्यंत आनंद घेत त्याने या गाण्यावर नाच केला. त्याच्या या नाचावर प्रेक्षकही फिदा झाले.

हेही वाचा : Govinda Naam Mera Trailer: कॉमेडी सस्पेन्सने भरलेला ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; विकी कौशलचा धमाकेदार अंदाज

‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’वर १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात विकी कौशल, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. भूमी पेडणेकर यात विकी कौशल्याच्या पत्नीच्या भूमिकेत दाखवली आहे तर विकी दुसरीकडे कियाराबरोबर रोमान्स करताना दिसून आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून तरी असं दिसत आहे हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित असेल. पहिल्यांदाच हे तीन कलाकार एकत्र काम करताना दिसत आहेत. या ट्रेलरमुळे सहाजिकच त्यांचे चाहते चित्रपट बघण्यास उत्सुक आहेत.

Story img Loader