Vicky Kaushal Express Gratitude After Chhaava Release : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘छावा’ प्रदर्शित होताच सर्वत्र शिवप्रेमींकडून ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या ऐवजी ‘छावा दिवस’ साजरा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘छावा’ सिनेमाच्या निमित्ताने शंभूराजेंचा इतिहास संपूर्ण जगाला समजला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या चित्रपटाची निर्मिती केल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. ‘छावा’ चित्रपटाची सध्याची बॉक्स ऑफिस कमाईची आकडेवारी पाहता चित्रपट येत्या काही दिवसांत कलेक्शनमध्ये इतिहास रचणार असा अंदाज अनेक चित्रपट समीक्षकांनी मांडला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने ३३.१ कोटींची कमाई केली आहे.

‘छावा’ प्रदर्शित झाल्यापासून दिग्दर्शकासह मुख्य भूमिकेत असलेल्या विकी कौशलचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या भूमिकेसाठी विकीने प्रचंड मेहनत घेतली होती. जवळपास ७-८ महिने विकी तलवारबाजी, घोडेस्वारी शिकला. याशिवाय त्याने २५ किलो वजन वाढवलं. या प्रशिक्षणानंतर शूटिंगला सुरुवात झाली होती. विकीने घेतलेली मेहनत चित्रपटात स्पष्टपणे दिसून येते.

विकी कौशलची पोस्ट

‘छावा’ला मिळणारं भरभरून प्रेम पाहून विकीने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता लिहितो, “तुमच्या प्रेमामुळे आज ‘छावा’ खऱ्या अर्थाने जिवंत झाला. तुमचे मेसेज, फोन, व्हिडीओ, चित्रपट पाहताना तुम्हाला आलेले अनुभव या सगळ्या गोष्टी पाहून मी भारावून गेलो आहे. मी सगळं काही पाहतोय…आणि चित्रपटाला मिळणारं प्रेम पाहून प्रचंड सुखावलो आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मन:पूर्वक आभार… छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास व त्यांची शौर्यगाथा सिनेमागृहांमध्ये जाऊन अनुभवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार… जर विश्वास तुमच्या साथीला असेल तर युद्ध सुद्धा एखाद्या उत्सवासारखं वाटतं” ( विश्वास आपका साथ हो, तो युद्ध लगे त्योहार! )”

दरम्यान, विकीच्या पोस्टवर बॉलीवूड अभिनेत्यांसह नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कतरिना कैफ, विकीचे आई-बाबा, भाऊ, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि ‘छावा’मधले विकीचे सहाय्यक कलाकार या सगळ्यांनी सिनेमा प्रदर्शित झाल्यावर विकीचं भरभरून कौतुक केलं आहे.