अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘सॅम बहादुर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहतेही विकीच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दलचे अपडेट्स विकी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. आता या सॅम बहादुर’ पाठोपाठ तो आणखी एका बायोपिकमध्ये दिसणार असल्याचं आता समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट म्हणजे भारतीय सैन्यातील पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा बायोपिक आहे. सॅम मानेकशॉ यांनी आपलं संपूर्ण जीवन भारतासाठी व्यतीत केले. ते भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल होते. ज्यांच्या नेतृत्वात भारताने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्ध जिंकले ज्यामुळे बांगलादेशचा जन्म झाला. बंगलादेशला स्वतंत्र देण्यात सॅम मानेकशॉ यांचा मोठा वाटा आहे.याचं दिग्दर्शन दिग्दर्शिका मेघना गुलजार करत आहेत. तर विकीबरोबरच या चित्रपटात अभिनेत्री सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेखही महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

आणखी वाचा : …म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित

यानंतर विकी आणखी एक बायोपिकमध्ये दिसू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘सॅम बहादुर’नंतर लगेचच विकी कौशल महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी ईशान खट्टर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारू शकतो अशी बातमी होती, मात्र आता विकीचे नाव समोर आले आहे. ‘सरदार उधम’ आणि ‘सॅम बहादुर’नंतर मेजर ध्यानचंद हा विकीचा तिसरा बायोपिक असेल.

हेही वाचा : करण जोहरने विकी कौशलला दिली ‘स्टुडंट ऑफ द इअर ३’ची ऑफर, अभिनेता म्हणाला…

पिंकविलाच्या जवळच्या एका सूत्राने त्यांना सांगितले की विकीला या चित्रपटाची कथा खूप आवडली असून हा चित्रपट करण्यास त्याने इंटरेस्ट दाखवला आहे. तर सध्या विकी आणि या चित्रपटाचे निर्माते यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यांच्यातली ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असून ही बोलणी यशस्वी झाली तर विकी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या भूमिकेत दिसेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vicky kaushal gets an offer to play lead role in major dhyanchand biopic rnv
Show comments