बॉलीवूड सुपरस्टार विकी कौशल आणि कतरिना कैफ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपल आहे. दोघांना आदर्श कपल अशी उपमा दिली जाते. या कपलचे चाहते सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. आता विकी-कॅटच्या चाहत्यांनी एका व्हिडीओमध्ये एक अशी गोष्ट पाहिली आहे की ज्याची चर्चा सध्या सगळीकडेच सुरू आहे.

विकीचा आगामी चित्रपट ‘बॅड न्यूज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन्सदरम्यान विकीने सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर रुही दोसानी हिच्याबरोबर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रुही विकीकडे ऑटोग्राफ मागायला जाताना दिसत आहे आणि तिने विकीकडे ऑटोग्राफसाठी पेन देताच तो पेनच बंद पडतो, अशी एक कॉमेडी रील दोघांनी शूट केली आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…

व्हिडीओच्या सुरूवातीला जेव्हा विकी त्याच्या फोनमध्ये व्यग्र असतो त्याच क्षणाला त्याच्या फोनमध्ये कतरिनाच्या बालपणीचा फोटो वॉलपेपर ठेवलेला दिसतो आणि संपूर्ण व्हिडीओमधील नेमका तो फोटो चाहत्यांनी पाहिला आणि आता हा फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विकी आणि कतरिना गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण विकी कौशलने याच चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात या अफवांना पूर्णविराम दिला होता. विकी म्हणाला होता की, ” आतासाठी आम्ही घेऊन येत असलेली बॅड न्यूज तुम्ही एन्जॉय करा, जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही ती बातमी तुम्हाला नक्कीच देऊ.”

हेही वाचा… ‘मुंज्या’ फेम अभय वर्माने नाकारला होता ‘हा’ चित्रपट, शाहरुख खानची लेक होती प्रमुख भूमिकेत; अभिनेता म्हणाला, “मी ऑडिशन दिलं आणि…”

दरम्यान, विकी कौशलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, विकी शेवटचा ‘सॅम बहादूर’ या चित्रपटात दिसला होता. आता आनंद तिवारी दिग्दर्शित, ‘बॅड न्यूज’ या आगामी चित्रपटात विकी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. विकीबरोबरच या चित्रपटात तृप्ती डिमरी, अम्मी विर्क आणि नेहा धुपिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा… “मला तुरुगांत टाकायला…”, समांथा रुथ प्रभुने सांगितला डॉक्टरांनी दिलेला धक्कादायक सल्ला, म्हणाली…

‘बॅड न्यूज’ हा एक विनोदी चित्रपट आहे, जो हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन (heteropaternal superfecundation) नावाच्या दुर्मीळ वैज्ञानिक घटनेशी संबंधित आहे, ज्याद्वारे एका महिलेला अनेक पुरुष भागीदारांद्वारे गर्भधारणा करता येते. ‘गुड न्यूज’चा सिक्वेल असलेला हा चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विकीचा ‘छावा’ हा आगामी चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता रश्मिका मंदानाबरोबर दिसणार आहे.

Story img Loader