कतरिना कैफ आणि विकी कौशल हे गेले काही दिवस सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. ९ डिसेंबर २०२१ या दिवशी हे दोघे लग्नबंधनात अडकले, शिवाय यांच्या लग्नाचीसुद्धा खूप चर्चा झाली. लग्नानंतरसुद्धा कतरिना आणि विकी चर्चेत होते. नववर्षाच्या स्वागतासाठी ही जोडी मुंबईबाहेर होती. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच या दोघांनी आता देवदर्शनाला लागले आहेत.
विराट कोहली, अनुष्कानंतर विकी कतरीनाने मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. हिरवी सलवार कुर्ता, पांढरा सदरा असा पोशाख या दोघांनी परिधान केला होता. यावेळी विकीची आई वीणादेखील उपस्थित होत्या. यावेळी दोघांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
कतरिना चिडली अन् १ कोटी रुपये वाचले, नेमकं काय घडलं विकीनेच सांगितलं
अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या डेटिंगपासून ते लग्नाच्या विधींपर्यंत सगळ्याच गोष्टी गुपित ठेवण्यात आल्या होत्या. लग्नाआधी या दोघांनी कधीच रिलेशनशिप किंवा लव्हस्टोरीबाबत भाष्य केलं नव्हतं. एवढंच नाही तर त्यांनी बॉलिवूडमधील कोणालाच लग्नासाठी निमंत्रण दिलं नव्हतं.
राजस्थानमधील सवाईमाधोपूर येथे ९ डिसेंबर २०२१ रोजी विकी- कतरिनाने सप्तपदी घेतले होते. पण त्याच्या खासगी स्वरुपाच्या लग्नसोहळ्याचे किस्से आजही चर्चेत असतात. कतरीना नुकतीच ‘भूत पोलीस’ चित्रपटात दिसली होती तर विकी कौशल ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसला आहे.