बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनला शनिवारी अबू धाबी येथे संपन्न झालेल्या ‘आयफा’ (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘आयफा’ सोहळ्याचे सूत्रसंचालन या वेळी विकी कौशल करीत होता. हृतिकने पुरस्कार जिंकल्यावर विकीने त्याला रंगमंचावर थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर दोघांनी हृतिकच्या जुन्या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातील गाण्यांची आजही चर्चा होताना दिसते. यातील ‘एक पल का जीना’ या गाण्याची हुक स्टेप तरुणाईच्या आजही लक्षात आहे. विकीने हृतिकला या लोकप्रिय गाण्यावर डान्स करण्याची विनंती केली. यानंतर हृतिक रोशन आणि विकी कौशल ‘आयफा’च्या रंगमंचावर एकत्र डान्स करत असल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हेही वाचा : Cannes 2023 : कान्सच्या रेड कार्पेटवर भारतीय पेहराव का केला? सारा अली खानने सांगितले कारण, म्हणाली…
हृतिकचा परफॉर्मन्स पाहून विकी कौशलने थक्क होऊन त्याच्यासमोर गुडघे टेकत त्याला सलाम ठोकला. विकी-हृतिकचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून हृतिकच्या अनेक चाहत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत अभिनेत्याचे कौतुक केले आहे. तसेच त्याच्या अनेक इन्स्टाग्राम फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एका युजरने यावर कमेंट करताना म्हटले आहे की, “२००० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. आज बरोबर २३ वर्षं झाली पण हृतिकच्या स्टेप्स कोणीही मॅच करू शकत नाही.”

हेही वाचा : Video: प्रसिद्ध अभिनेत्याने रणबीर कपूरच्या लोकप्रिय गाण्यावर स्कर्ट घालून केला डान्स; व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात हृतिक रोशनला ‘विक्रम वेधा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तसेच ‘गंगूबाई काठियावाडी’साठी आलिया भट्टचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मान करण्यात आला. याशिवाय कमल हासन यांना भारतीय चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष पुरस्कार मिळाला.