बॉलीवूड स्टार विकी कौशल लवकरच ‘बॅड न्यूज’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याचा आगामी चित्रपट ‘बॅड न्यूज’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी मुंबई येथे या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच इव्हेंट पार पडला. या इव्हेंटला विकी कौशल, तृप्ती डिमरा, ॲमी विर्क तसेच निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक आनंद तिवारी यांनी हजेरी लावली होती.

या ट्रेलर लॉंचच्या इव्हेंटदरम्यान मीडियाकडून विकी कौशलला प्रश्न विचारण्यात आला की, विकी आणि कतरिना प्रेग्नेन्सीची गुड न्यूज कधी देणार आहेत? विकी निरागसपणे हसला आणि म्हणाला की, ते दोघंही योग्य वेळी बातमी जाहीर करतील.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

हेही वाचा… …अन् जुई गडकरीवर आली पिस्तूल बाळगण्याची वेळ; अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “मला जीवे मारण्याची…”

कतरिनाच्या प्रेग्नेन्सीची अफवा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. आता यावर विकीने मौन सोडलं आहे. या इव्हेंटमध्ये जेव्हा विकीला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा विकी म्हणाला, आतासाठी आम्ही घेऊन येत असलेली बॅड न्यूज तुम्ही एन्जॉय करा, जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही ती बातमी तुम्हाला नक्कीच देऊ.

कतरिना कैफच्या प्रेग्नेन्सीच्या अफवा त्यांच्या लंडन ट्रिपमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरू झाल्या होत्या. परंतु, अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चांवर तिच्या टीमने स्पष्टीकरण दिलं होतं. ती गरोदर असल्याच्या निव्वळ अफवा आहेत. कतरिना गरोदर नाही, असं तिच्या टीमने स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा… “मांजरीची तीन पिल्लं गाडीच्या बोनेटमध्ये…”, ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला धक्कादायक प्रसंग, म्हणाल्या…

२०२१ रोजी राजस्थानमध्ये विकी आणि कतरिनाने लग्नगाठ बांधली. विकी शेवटचा ‘सॅम बहादूर’ या चित्रपटात दिसला होता, आता आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’मध्ये विकी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे; तर ‘छावा’ या चित्रपटात विकी रश्मिका मंदानाबरोबर दिसणार आहे. तर कतरिना ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात शेवटची झळकली होती. कतरिना लवकरच फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा… लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हा पती झहीर इक्बालबरोबर गेली डिनर डेटला; मेहेंदीवरून नेटकऱ्यांनी केली शंका व्यक्त, म्हणाले…

दरम्यान, ‘बॅड न्यूज’ हा एक विनोदी चित्रपट आहे, जो हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन (heteropaternal superfecundation) नावाच्या दुर्मीळ वैज्ञानिक घटनेशी संबंधित आहे, ज्याद्वारे एका महिलेला अनेक पुरुष भागीदारांद्वारे गर्भधारणा करता येते. ‘गुड न्यूज’चा सिक्वेल असलेला हा चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader