अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपं आहे. २०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. तर आता लग्नानंतर पहिल्यांदाच विकी कौशल्य सगळ्यांसमोर बेबी प्लॅनिंगबद्दल भाष्य केलं आहे.

विकी कौशल लवकरच ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. याचबरोबर या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तो अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. दरम्यान अशाच एका कार्यक्रमामध्ये त्याने बेबी प्लॅनिंग आणि घरच्यांचं याबद्दल असलेलं मत सांगितलं.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

आणखी वाचा : “कतरिना वहिनीपेक्षा…,” विकी कौशल व सारा अली खानला सिद्धिविनायकाचं एकत्र दर्शन घेताना पाहून चाहते नाराज

एका कार्यक्रमात त्याला “लग्नानंतर घरचे तुमच्यावर बाळासाठी दबाव टाकत आहेत का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत तो म्हणाला, “नाही. आमच्या घरचे आमच्यावर बाळासाठी कोणताही दबाव टाकत नाहीत. आमच्या दोघांचंही कुटुंब खूप छान आहे. मुख्य म्हणजे आमच्या कुटुंबातील वडीलधारी मंडळी कुल आहेत. मी माझ्या आई-वडिलांपासून कधीच कोणती गोष्ट लपत नाही. माझ्या आणि कतरिनाच्या नात्याबद्दलही मी माझ्या आई-वडिलांना सगळ्यात आधी सांगितलं होतं. त्यामुळे असं एकदाही घडलं नाही की एखादी पोस्ट व्हायरल झाली आणि त्यानंतर मी आई-वडिलांना त्याबद्दल माहिती दिली. त्यांना माझ्याबद्दल सगळं आधीच माहीत असतं.”

हेही वाचा : …म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित

तर आता विकीचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. याचबरोबर सोशल मीडियावर कमेंट करत त्याचे चाहदे आणि नेटकरी विविध प्रतिक्रिया यावर देत आहेत.

Story img Loader