बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या त्यांच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी आणि सारा नुकतेच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचले. या कार्यक्रमात विकीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक धक्कादायक खुलासा केले आहेत. या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “… त्यापेक्षा हिंदू हो,” महाकाल मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान ट्रोल

विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या साराने चित्रपटात विकीला खूप मारहाण केल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओवरून विकीची खिल्ली उडवीत कपिल त्याला विचारतो, “पाजी हे काय होत आहे? गेल्या काही चित्रपटांमध्ये तुम्ही लग्न करून भांडण करताना दिसत आहात?”

कपिल शर्माचे बोलणे ऐकून विकी कौशल जोरात हसायला लागतो. यानंतर तो म्हणतो, “पाजी असं खूप होत आहे. मागच्या चित्रपटात मला मारहाण झाली होती. या चित्रपटातही मला मारहाण होत आहे. खऱ्या आयुष्यात असं होत नाही.” हे ऐकून कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व जण जोरजोरात हसायला लागतात.

हेही वाचा- सोनाक्षी सिन्हाने मुंबईत खरेदी केले नवीन आलिशान घर; फोटो शेअर करीत दाखवली फ्लॅटची झलक

विकी कौशल आणि सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.