बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘हाऊ इज द जोश’ म्हणत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. विकीने ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, ‘संजू’, ‘मसान’, ‘राझी’ या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करीत अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले, परंतु ‘उरी’नंतर २१ फेब्रुवारी २०२० ला रिलीज झालेल्या विकीच्या ‘भूत’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी केली नाही.

‘भूत’ चित्रपटानंतर विकी कौशलचे ‘सरदार उधम’ आणि ‘गोविंदा नाम मेरा ‘हे दोन्ही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले होते. ‘सरदार उधम’ चित्रपटातील अभिनयासाठी विकीचे प्रचंड कौतुक केले गेले. परंतु कोरोना आणि लॉकडाऊन संपल्यावर विकीचा एकही चित्रपट थेट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला नाही. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या निमित्ताने विकी कौशल तीन वर्षांनी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करणार आहे. २०२३ च्या उरलेल्या सात महिन्यांमध्ये त्याचे चार चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

हेही वाचा : “प्रेम, लग्न आणि घटस्फोट…” विकी-साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

विकी कौशलचा लॉकडाऊननंतर बॉक्स ऑफिसवर पहिला चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना सारा अली खान आणि विकी कौशल ही नवी ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळेल. या चित्रपटाची कथा मध्यमवर्गीय विवाहित जोडप्याच्या आयुष्यावर आधारित आहे. ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाबाबत अतुल कुलकर्णी यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले, “प्रेक्षकांनी काय बघावे हे इतर…”

‘जरा हटके जरा बचके’नंतर विकी कौशल ‘लैला मजनू’ आणि बुलबुल फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीबरोबर झळकणार असून हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेता ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ तसेच बहुचर्चित बायोपिक ‘सॅम बहादूर’ चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल ‘सॅम मानेकशॉ’ यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम बहादूर’ बायोपिक पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

Story img Loader