विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन गीतकार गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार हिने केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मेघना व विकी यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत विकीने मेघना, तिचे वडील गुलजार आणि पावसाचा एक किस्सा सांगितला. त्यानुसार पाऊस चालू झाला की मेघना वडिलांना मेसेज करून पाऊस थांबवायला सांगते.

गुलजार यांची मुलगी असण्याचा फायदा कोणता?

मेघनाने ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत गोयंका यांच्याशी गप्पा मारल्या. या कार्यक्रमात रॅपिड फायर राउंडमध्ये अनंत यांनी मेघनाला विचारलं की तिला प्रसिद्ध गीतकार गुलजार यांची मुलगी असल्याचा काय फायदा झाला आहे. यावर मेघना म्हणाली, त्यांची मुलगी असण्याचा एक सर्वात मोठा फायदा असा की तिला जेव्हा कोणतंही गाणं पाहिजे असतं तेव्हा तिच्याकडे गुलजार यांच्या रूपात जगातील सर्वात उत्तम गीतकार केव्हाही उपलब्ध असतात.

it might seem harmless to share a toothbrush with your partner
Share Toothbrush : तुमचा टूथब्रश तुम्ही जोडीदाराबरोबर शेअर करता का? मग थांबा! डेंटिस्ट काय म्हणतात एकदा वाचा…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
amla and dates as powerful alternatives to beetroots and pomegranates for anemia treatment
तुम्हाला ॲनिमिया आहे अन् बीटरुट व डाळिंब खायला आवडत नाही? मग तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ दोन फळे खा
Low back pain: If you have lower back pain, stay a mile away from this food item
Low back pain : पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? डॉक्टरांचं ऐका आणि ‘हे’ पदार्थ पूर्णत: बंद करा
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Ganesh chaturthi 2024 khajur ladoo recipe in marathi
Ganesh chaturthi 2024: नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू
Making modak for beloved bappa
लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे
Seat Belt in Car
कारमध्ये सीट बेल्ट लावणे का आवश्यक आहे? तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ‘हा’ Video एकदा पाहाच, तुम्हालाही समजेल!

“मी चित्रपट दोनदा पाहिला आणि…”, ‘सॅम बहादुर’बद्दल सॅम माणेकशा यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “जेव्हा विकी…”

विकीने सांगितला मेघना, गुलजार आणि पावसाचा किस्सा

यानंतर विकी कौशलने गुलजारशी संबंधित एक अतिशय रंजक किस्सा सांगितला. विकी म्हणाला, “मेघना चित्रपटाच्या सेटवर कधीही तिचा मोबाईल जवळ ठेवत नाही. पण एकदा अचानक सेटवर पाऊस सुरू झाला तेव्हा मला दिसलं की मेघना बाजूला उभी राहून तिच्या फोनवर कोणालातरी मेसेज करत आहे. मग मी विचारलं की तू कोणाला मेसेज करत आहेस? तेव्हा वडिलांशी बोलत असल्याचं मेघनाने सांगितलं.”

दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीचा ‘छपाक’वर परिणाम झाला, मेघना गुलजारचं स्पष्ट मत; म्हणाली…

विकी पुढे म्हणाला की मेघना तिच्या वडिलांना मेसेज करत होती की सेटवर पाऊस पडत आहे, तो प्लीज थांबवा. गुलजार सरांचा रिप्लाय आला की ‘किती वेळेत पाऊस थांबवायचा आहे’. मेघना म्हणाली ‘अर्धा तास’. त्यानंतर खरंच अर्ध्या तासात पाऊस थांबला, असं विकी म्हणाला.

मेघनाच्या म्हणण्यानुसार नेहमीच असं होतं की ती गुलजार सरांना मेसेज करून पाऊस थांबवते, असं विकीने सांगितलं. हे ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. मेघना ही अभिनेत्री राखी आणि गीतकार गुलजार यांची मुलगी आहे.