बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये विकी कौशलचे नाव घेतले जाते. विकीने २०२१ मध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफबरोबर लग्नगाठ बांधली. परंतु कतरिनाशी लग्न होण्यापूर्वी अभिषेक बच्चनने विकीला वैवाहिक आयुष्याबाबत सल्ला दिला होता. याबाबत विकीने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता.

हेही वाचा : “आधी मित्रांना ब्रेकअपविषयी सल्ला द्यायचो, पण…” रणबीर कपूरने सांगितली ‘ती’ आठवण, म्हणाला…

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

विकी कौशलने ‘ब्राइड्स टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मला २०१८ मध्ये अभिषेक बच्चनकडून वैवाहिक आयुष्याबाबत एक सल्ला मिळाला होता. ‘जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बायकोला सॉरी म्हणायचे आणि त्यानंतर सकाळी उठल्यावरसुद्धा बायकोला सॉरी म्हणायचे, असे केलेस तरच तू खूप आनंदी राहशील.'” तसेच वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यावर मी लगेच लग्नाचे प्लॅनिंग करणार, असेही काही वर्षांपूर्वी विकीने सांगितले होते.

हेही वाचा : “पैसे आल्यानंतर आम्ही ‘मन्नत’ बंगला खरेदी केला, पण…” शाहरुखने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “मी गौरीला…”

विकी कौशलने ९ डिसेंबर २०२१ रोजी कतरिनासह लग्न केले. राजस्थानमध्ये कुटुंबातील मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत कॅट-विकीने लग्नगाठ बांधली. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे अनेक फोटो पोस्ट करत असतात. या अभिनेत्याला ‘जरा हटके जरा बचके’च्या ट्रेलर लॉंचदरम्यान कतरिनापेक्षा चांगली बायको मिळाली, तर तिला सोडणार का, असा प्रश्न विचारला होता. यावर, “मला असे प्रश्न विचारू नका, घरी जायचे आहे,” असे मजेशीर उत्तर देत, जन्मोजन्मी कतरिनाच बायको म्हणून हवी असल्याचे विकीने नमूद केले.

दरम्यान, विकीचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार असून यामध्ये त्याच्याबरोबर सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून विकीच्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटाचीसुद्धा प्रतीक्षा आहे.

Story img Loader