कतरिना कैफ आणि विकी कौशल बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे. बॉलीवूडमधील अनेक इव्हेंट्स आणि पार्टीमध्ये दोघे एकत्र दिसतात. कतरिना जेव्हा घरी असते तेव्हा माझी आई आनंदी असते, असं एका मुलाखतीत विकी म्हणाला होता.
अलीकडेच ‘द वीक’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा विकीला विचारण्यात आलं की, त्याला जेवण बनवता येतं का? तेव्हा विकी म्हणाला, “माझ्या संपूर्ण आयुष्यात जेवण करायला मला कधीच जमणार नाही. मी फक्त चहा बनवू शकतो आणि जास्तीत जास्त अंडं फोडू शकतो आणि हेसुद्धा मी कोरोना काळात शिकलो. कारण- तेव्हा मी रात्र रात्र जागून चित्रपट पाहायचो. कारण- त्या वेळेस माझ्याकडे दुसर करायला काहीच नव्हतं. सनी (विकीचा भाऊ) खूप चांगलं जेवण बनवतो. तो माझ्यापेक्षा फक्त एक वर्ष आणि चार महिन्यांनी लहान आहे. त्यामुळे आम्ही मित्रासारखेच राहतो. मी त्याला कोणताही सल्ला देत नाही आणि तो माझ्याकडून कोणताही सल्ला घेत नाही. आम्ही फक्त आमचे अनुभव एकमेकांना शेअर करतो. तो माझ्यापेक्षा खूप समजूतदार आणि शांत आहे.”
विकीला पुढे जेव्हा त्याच्या घरातील खाद्यपदार्थांच्या निवडीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, “खाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं, तर कतरिना माझ्यापेक्षा जास्त शाकाहारी आहे. तिला साधं खायला खूप आवडतं. फार क्वचित ती छोले-भटुरे खाते; पण मी ते आवडीने खातो. जेव्हा कतरिना घरी असते तेव्हा माझ्या आईला खूप बरं वाटतं. ती म्हणते, “मी आयुष्यभर माझ्या मुलांना तोंडली, फरसबी, दोडका असं पौष्टिक खायला मिळावं यासाठी त्यांच्या मागे लागलेय आणि आता माझी सून आहे; जी हे रोज खाते. कतरिनाचं हे मुख्य अन्न आहे. तिला पॅनकेक्स खूप आवडतात.”
हेही वाचा… सुहाना खानचा बाथटबमधील व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “रमजान सुरू आहे, जरा तरी लाज…”
दरम्यान, विकी आणि कतरिनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ चित्रपटात विकी रश्मिका मंदानाबरोबर दिसणार आहे. तर आगामी चित्रपट ‘मेरे मेहबूब मेरे सनम’मध्ये विकी तृप्ती डिमरीबरोबर झळकणार आहे. फरान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटात तो कतरिना, प्रियांका चोप्रा व आलिया भट्टबरोबर दिसणार आहे.