बॉलीवूड अभिनेता विकी कौशल हा सध्या त्याच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून या चित्रपटाची आणि विकी कौशलने ‘तौबा तौबा’ या गाण्यात केलेल्या डान्सची चर्चा होती. मात्र आता त्याने एका मुलाखतीदरम्यान ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाचे शूटिंग करताना मार खाल्ला असता आणि पोलिसांकडून अटक झाली असती, असा खुलासा त्याने केला आहे.

सध्या अभिनेता म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या विकी कौशलने चित्रपटसृष्टीतील आपल्या करिअरची सुरूवात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली होती. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटासाठी त्याने अनुराग कश्यप यांचा असिस्टंट म्हणून काम केले होते.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”

काय म्हणाला विकी कौशल?

विकी कौशलने नुकतीच तन्मय भट याच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही किस्से सांगितले आहेत. तो म्हणतो- “चित्रपटात कोळसा तस्करीचा जो सीन आहे, तो खरा आहे. आम्ही तो शूट केला होता. पण वाळू तस्करीचा सीन शूट करायचा होता त्यावेळी आमच्यासोबत एक घटना घडली होती. जेव्हा आम्ही तो सीन शूट करण्यासाठी गेलो, तेथील दृश्य पाहिल्यानंतर मी चकित झालो, कारण तिथे फक्त दोन ट्रक नव्हते, तर ५०० ट्रक होते. ते पाहिल्यावर तुम्हाला असे वाटणारच नाही की, हे बेकायदेशीररित्या चालू आहे, इतक्या उघडपणे वाळू तस्करी चालू होती. आम्ही गुपितपणे तो सीन शूट करत होतो आणि तेवढ्यात काही लोक आमच्याजवळ आले. ५०० लोकांनी आम्हाला वेढा घातला होता. जो कॅमेरामॅन होता, त्याचे वय ५० पेक्षा जास्त होते. कॅमेरा वेळेत पोहचू शकत नाही, कारण आम्ही अडकलो आहे, हे सांगण्यासाठी त्याने युनिटला फोन केला. त्याचे फोनवरील बोलणे ऐकून एका माणसाला वाटले आम्ही कोणालातरी बोलावण्यासाठी फोन केला आहे आणि कॅमेरामॅनला कानाखाली मारली. त्यानंतर त्यांनी कॅमेरा हिसकावून घेतला आणि कॅमेरा फोडून टाकेन अशी धमकी द्यायला सुरूवात केली. आम्ही त्यादिवशी वाळमाफियांकडून मार खाल्ला असता मात्र तिथून कसेतरी निसटलो.”

हेही वाचा: “मी बॉलीवूडमधील दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केले आणि माझी ओळख…”,रणबीर कपूरचा खासगी आयुष्यावर खुलासा

याच चित्रपटाचा आणखी एक किस्सा सांगताना म्हटले आहे, “आमच्याकडे एका व्हॅनमध्ये कॅमेरा होता आणि आम्ही बनारस स्टेशनवर शूटिंग करत होतो. शॉट असा होता की नवाजुद्दीन सिद्दीकी स्टेशनच्या बाहेर येईल, सायकल रिक्षात बसेल आणि निघून जाईल. पण छुप्या कॅमेराने शूटिंग करत होतो, मात्र तरीही आम्हाला एक चांगला शॉट पाहिजे होता. त्यादरम्यान दोन पोलिस कॉन्स्टेबल आमच्याकडे बोट दाखवत तुम्ही कोण आहात, असे विचारत असलेले दिसले. त्यानंतर मी व्हॅनचा वेग वाढवायला सांगितला. अशाप्रकारे ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपट बनला.” अशी आठवण विकीने या मुलाखतीदरम्यान सांगितली.

दरम्यान, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाईदेखील केली होती. आजही या चित्रपटाचा चाहतावर्ग मोठा आहे.