बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट आज (१ डिसेंबर) देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे अभिनेता सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. विकी कौशल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकी कौशलने पत्नी कतरिनाशी संबंधित काही गुपितं उघड केली आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकी कौशलला कतरिनाकडून काय शिकायला मिळालं, असा प्रश्न विचारण्यात आला. विकी म्हणाला, “कतरिना माझ्या फॅशनबद्दल माझ्या तोंडावर वाईट बोलते. मी काय घालायला पाहिजे हे कतरिनाच ठरवते आणि तसं झालं नाही तर ती तोंडावर म्हणते की काय जोकर दिसत आहेस. एकदा मी कुठेतरी जात होतो. तिने अक्षरशः माझा हात ओढला आणि ‘तू असा बाहेर जाणार नाहीस’ असं म्हणत मला मागे खेचलं. मी कतरिनाला विचारलं की यात काय वाईट आहे आणि मग ती म्हणाली की सगळंच वाईट आहे. त्यानंतर मी पुन्हा कपडे बदलले.”

dead butt syndrome
तुम्हीही तासनतास बसून काम करता का? मग तुम्हाला होऊ शकतो डेड बट सिंड्रोम
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
article analysis about close relationships zws 70
तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?
What Does 'Dhol Tasha' Mean?
“ढोल ताशा म्हणजे नेमकं काय?” सोशल मीडियावर VIDEO होतोय व्हायरल
NEW BORN GIRL
“मुलीचा रंग जरा काळाच आहे ना…”; नवजात बाळाच्या रुपाचीही समाजाला चिंता!
Paris Paralympics 2024 | what is the meaning of The Agitos Logo
Paralympics 2024 : पॅरालिम्पिक लोगोचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या, काळानुसार लोगो कसा बदलला?
Overcome unwanted Food cravings
Unwanted Food Cravings: क्रेव्हिंगवर कंट्रोल होत नाही? आहारतज्ज्ञांनी सांगितलेला ‘हा’ उपाय लक्षात ठेवा; डाएट करताना होईल उपयोग
Gajar Burfi Recipe In Marathi Gajar Burfi Recipe Burfi Recipe in marathi
एकदा खाल्ली की खातच राहावीशी वाटणारी गाजराची बर्फी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

“मी चित्रपट दोनदा पाहिला आणि…”, ‘सॅम बहादुर’बद्दल सॅम माणेकशा यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “जेव्हा विकी…”

विकी कौशलने कतरिनाचं कौतुक केलं. “जेव्हा जेव्हा कोणताही अॅक्शन सीन किंवा गाणं किंवा शूटिंग असतं तेव्हा ती खूप तयारी करते. ती खूप मेहनत करते. कोणत्याही शूटच्या ५ महिने आधीच तिची तयारी सुरू होते. ती तिचा डाएट बदलते आणि दिनचर्याही बदलते. एवढी शिस्त मी आजवर पाहिली नाही. मी शिस्तबद्ध राहणं तिच्याकडून शिकलो,” असं विकी कतरिनाबद्दल म्हणाला.

विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले आहे. हा चित्रपट सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची आज बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूर स्टारर ‘अॅनिमल’ या चित्रपटाशी टक्कर होत आहे. विक्की कौशलशिवाय सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.