विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलीवूडमधील चर्चेत जोडींपैकी एक आहेत. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी राजस्थानमध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत विकीने कतरीनाबाबत मोठा खुलासा केला आहे.
अलीकडेच विकी ‘वुई आर युवज’ या टॉक शोच्या ‘बी अ मन यार’ एपिसोडमध्ये दिसला होता. यादरम्यान त्याने त्याच्या कतरिनाच्या प्रेमकथेबद्दल अनेक खुलासे केले. विकी म्हणाला, ‘सुरुवातीला मला धक्काच बसला होता की एवढी मोठी बॉलीवूड स्टार माझ्यावर प्रेम करत आहे. मला हे विचित्र वाटले. माझा यावर विश्वास बसत नव्हता.
विकी म्हणाला, “कतरिना खूप छान व्यक्ती आहे. जेव्हा मी तिला ओळखले तेव्हा मला वाटले की मी माझे संपूर्ण आयुष्य तिच्याबरोबर घालवू शकतो. एके दिवशी मी तिला मेसेज केला आणि जेवायच निमंत्रण दिलं. तेव्हापासून आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पण कतरिना लग्नाला हो म्हणेल असे मला कधीच वाटले नव्हते. मात्र, आम्ही सुरुवातीपासूनच एकमेकांसाठी गंभीर होतो. हे नातं पुढे जाईल असं आम्हा दोघांनाही आधीच वाटत होतं.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी २०२१ साली लग्नगाठ बांधली. राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका भव्य किल्ल्यात दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नात कतरिना आणि विकीचे फक्त जवळचे मित्र आणि कुटुंब सहभागी झाले होते. त्याच्या शाही लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली होती.
दोघांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी विकीचा जरा हटके जरा बचके चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विकीबरोबर सारा अली खान मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता विकी लवकरच बहुचर्चित सॅम बहादूर चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तर, कतरिना कैफ सलमान खान आणि इमरान हाश्मी यांच्याबरोबर ‘टायगर ३’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.