विकी कौशल हा बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘मसान’, ‘राझी’, ‘संजू’, ‘सरदार उधम’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये अभिनेत्याने काम केलं आहे. ‘राझी’ चित्रपटात अभिनेत्याने आलिया भट्टसह प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. ‘राझी’च्या यशानंतर लवकरच पुन्हा एकदा विकी मेघना गुलजार यांच्या बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शनाच्या मार्गावर असणाऱ्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Bigg Boss 17: बिग बॉसच्या आगामी पर्वात सिस्टम हँग करायला एल्विश यादव नाही, तर ‘ती’ येणार?

‘सॅम बहादुर’ चित्रपट १९७१ च्या युद्धात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित असणार आहे. १९७१ चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांची भूमिका विकी कौशल साकारणार असून हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : ऋता दुर्गुळेची नवऱ्यासह रोमँटिक ट्रिप, आलिशान रिसॉर्टचं एका दिवसाचं भाडं माहितीये का?

‘सॅम बहादुर’चा टीझर १३ ऑक्टोबरला मुंबईत एका कार्यक्रमात प्रदर्शित केला जाणार आहे. यावेळी चित्रपटातील कलाकार, निर्माते आणि इतर सहकारी उपस्थित असतील. याशिवाय पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, १४ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात या बायोपिकचा ट्रेलर दाखवण्यात येणार आहे. यासाठी निर्मात्यांनी स्टार नेटवर्कशी करार केला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा विश्वचषकातील सामना कोट्यवधी क्रिकेटप्रेमी पाहतील. त्यामुळेच निर्मात्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा : “मी आता असं काहीतरी पाहिलं…”, सई ताम्हणकरची ती पोस्ट चर्चेत, ‘आत्मपॅम्फ्लेट’चा उल्लेख करत म्हणाली…

दरम्यान, १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सॅम माणेकशॉ हे भारताचे लष्कर प्रमुख होते. या युद्धानंतर त्यांना बढती मिळाली आणि ते भारतीय लष्काचे पहिली फिल्ड मार्शल झाले. सॅम माणेकशॉ हे सैन्यात सॅम बहादूर म्हणून प्रसिद्ध होते. २७ जून २००८ रोजी तामिळनाडूत त्यांचं निधन झालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vicky kaushal sam bahadur teaser out on october 13th to screen during india vs pakistan match sva 00