अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी आणि सारा ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जरा हटके जरा बचके’ हा विकी कौशल आणि सारा अली खान यांचा एकत्र पहिला चित्रपट असून पुढच्या महिन्यात २ जूनला रिलीज होणार आहे. शाहरुखच्या ‘जवान’मुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली नव्हती, परंतु ‘जवान’चे प्रदर्शन पुढे ढकलल्यावर आता ‘जरा हटके जरा बचके’ २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हेही वाचा : “हा शेवटचा चित्रपट…” ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचे वक्तव्य, म्हणाली “पुन्हा संधी मिळेल की नाही…”
चित्रपटाची कथा इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित आहे. कपिल आणि सौम्या एकत्र कॉलेजमध्ये असताना प्रेमात पडतात. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांचे लग्न होते, परंतु कालांतराने संपूर्ण चित्र बदलून लग्नानंतर भांडणे वाढतात. दोघांमधील भांडण इतके वाढते की, प्रकरण कोर्टात जाऊन घटस्फोटापर्यंत पोहोचते. ट्रेलरमध्ये कपिल आणि सौम्या एकीकडे एकांतात प्रेम करताना आणि दुसरीकडे कुटुंबासमोर भांडताना दिसत आहेत. त्यामुळे चित्रपटात नेमका काय ट्विस्ट येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा : “मला मुलगी झाली तर…” बाळाच्या प्लॅनिंगबाबत राजकुमारचा खुलासा; अभिनेत्याचे उत्तर ऐकून शहनाझ झाली खूश
हेही वाचा : ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाबाबत अतुल कुलकर्णी यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले, “प्रेक्षकांनी काय बघावे हे इतर…”
राकेश बेदी, शारिब हाश्मी, नीरज सूद यांसारखे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘जरा हटके जरा बचके’ची निर्मिती मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओज यांनी केली असून चित्रपट, २ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर विकी-साराच्या चाहत्यांनी दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.