अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘सॅम बहादुर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहतेही विकीच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दलचे अपडेट्स विकी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो. यापूर्वी त्याने या चित्रपटातील त्याचा लुक पोस्ट केला होता आणि त्यानंतर या चित्रपटाच्या तयारीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावरून चाहत्यांना दाखवला होता. आता पुन्हा एकदा या चित्रपटाबद्दल त्याने एक पोस्ट केली आहे.

आणखी वाचा : दीपिका पदुकोणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पटकावला ‘हा’ आंतरराष्ट्रीय बहुमान

विकी गेले अनेक दिवस या चित्रपटावर काम करत आहे. आता या चित्रपटाच्या शिटिंग दरम्यानचा एक फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. विकीच्या या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचे शूटिंग पूर्ण केले आहे. या फोटोमध्ये विकीने पाठीवर “सॅम बहादुर” असे लिहिलेला हिरव्या रंगाचा हुडी घातला आहे, तर त्याच्याबरोबर दिग्दर्शिका मेघना गुलजारही दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तो काहीसा भावूक झालेला दिसला. त्याने लिहिले, “पाच शहरांमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ दिवस रात्र काम केल्यानंतर ‘सॅम बहादूर’चे शेड्युल आम्ही पूर्ण केले आहे. तरी अजून काही शहरांमध्ये अजून काही महिने काम करायचे आहे. ‘सॅम बहादूर’ बनवण्याचा प्रवास अजूनही सुरू आहे. टीम, आपण लवकरच भेटू.”

सॅम माणेकशॉ यांच्या चरित्रपटामध्ये विकी कौशलसह सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख दिसणार आहेत. सान्या सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची, तर फातिमा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत असे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहेत. विकीच्या ‘राझी’ चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनीच केले होते.

हेही वाचा : ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर कतरिनाचा विकी कौशलबद्दल खुलासा म्हणाली, “मी त्याचं फक्त नाव…”

‘सॅम बहादुर’ चित्रपटाव्यतिरिक्त विकीचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट काही महिन्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटामध्ये विकी कौशल आणि सारा अली खान ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे.

Story img Loader