अभिनेता विकी कौशल गेले काही महिने त्याच्या आगामी ‘सॅम बहादुर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहतेही विकीच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दलचे अपडेट्स विकी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो. यापूर्वी त्याने या चित्रपटातील त्याचा लूक पोस्ट केला होता.
याबरोबरच या चित्रपटाच्या तयारीचा एक व्हिडीओही त्याने सोशल मीडियावरून चाहत्यांना दाखवला होता. आता नुकतंच विकी कौशलने ‘सॅम बहादुर’चा फर्स्ट लुक त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केला आहे. विकीची पोस्ट पाहून त्याचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. या पोस्टरमध्ये विकी सॅम बहादुर यांच्या पोषाखात पाठमोराय उभा असलेला दिसत आहे.
आणखी वाचा : ‘कॉफी विथ करण ८’ मध्ये कार्तिक आर्यन लावणार हजेरी? ‘दोस्ताना २’दरम्यान झालेल्या वादावर करणार भाष्य
या पोस्टरवर लिहिलं आहे की “जिंदगी ऊनकी, इतिहास हमारा’. या फर्स्ट लुकमध्ये विकी कौशलला डॅशिंग सॅम माणेकशॉ यांच्या अवतारात पाहून नेटकरी व विकीचे चाहते खुश झाले आहेत. विकीने या भूमिकेसाठी किती मेहनत घेतली आहे ते या पोस्टरवरून स्पष्ट होत आहे.
विकीचे चाहते या पोस्टवर कमेंट करत या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत. सॅम माणेकशॉ यांच्या चरित्रपटामध्ये विकी कौशलसह सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख दिसणार आहेत. सान्या सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची, तर फातिमा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत.