विकी कौशल(Vicky Kaushal)ची प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी कौशल मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी अभिनेता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावताना दिसत आहे. आता तो पाटणा येथे गेला होता. त्या वेळचा एक व्हिडीओ अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकी कौशलने लिट्टी-चोखाचा आस्वाद

विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो लिट्टी-चोखा हा पदार्थ खाताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही मोठ्या हॉटेलमध्ये नाही, तर रस्त्यावरील एका स्टॉलवर तो लिट्टी-चोखा खाताना दिसत आहे. त्याच्याभोवती गर्दी दिसत आहे.

अभिनेता हा पदार्थ खाण्याचा आनंद घेत असताना एक व्यक्ती त्याला विचारतो की चव कशी आहे? त्यावर अभिनेत्याने खूप छान, असे म्हणत कौतुकही केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्याने पाटणामध्ये येऊन लिट्टी-चोखा खाणार नाही, असे होणार नाही, असे लिहीत विकी कौशलने त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

छावा या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, अभिनेता अक्षय खन्नादेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमधील दृश्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अंगावर शहारा व डोळ्यांत पाणी आणणारे सीन पाहून प्रेक्षकांनी ट्रेलरचे मोठे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. त्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज लेझीम नृत्य करीत असल्याच्या दृश्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र, लक्ष्मण उतेकर यांनी सीन हटविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकरने महत्वाची भूमिका साकारली आहे. रायाजी या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याने विविध मुलाखतींमध्ये विकी कौशलच्या कामाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, १४ फेब्रुवारी २०२५ ला छावा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानंतर अभिनेता महाअवतार या चित्रपटात दिसणार आहे. आता ट्रेलरप्रमाणेच छावा या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.