Sam Bahadur Teaser: अभिनेता विकी कौशल गेले काही महिने त्याच्या आगामी ‘सॅम बहादुर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहतेही विकीच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दलचे अपडेट्स विकी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो. यापूर्वी त्याने या चित्रपटातील त्याचा लूक पोस्ट केला होता.

याबरोबरच या चित्रपटाच्या तयारीचा एक व्हिडीओही त्याने सोशल मीडियावरून चाहत्यांना दाखवला होता. काल विकीने ‘सॅम बहादुर’चा फर्स्ट लुक त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केला ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. लोकांनी त्याच्या या लुकवर कॉमेंट करत उत्सुकता दर्शवली. तर नुकतंच काही वेळापूर्वी ‘सॅम बहादुर’चा टीझरही प्रदर्शित झाला आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

आणखी वाचा : “मुलीच्या पोटावर पाय देणार का?” श्वेता तिवारीचं जबरदस्त बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांनी केला सवाल

विकी कौशलने टीझरचा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. टीझरमध्ये विकी कौशल फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. विकीने या भूमिकेसाठी एवढी मेहनत घेतली आहे की त्याची संवादफेक, देहबोली ही सगळंच अगदी अचूक जमून आल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे. एका सोल्जरसाठी देश हा नेहमीच पहिले येतो हेच या टीझरमधून दाखवण्यात आलं आहे.

चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग अधोरेखित करण्यात येणार असल्याचं टीझरमध्ये स्पष्ट होत आहे. एका आर्मी अफिसरच्या भूमिकेत विकी अगदीच शोभून दिसत आहे. चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीच भूमिका सान्या मल्होत्राने केली असून अभिनेत्री फातीमा सना शेख ही इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये सॅम माणेकशॉ आणि इंदिरा गांधी यांच्यातील एक छोटसं संभाषणही प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरलं आहे.

चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं असून हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. विकीचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत व त्यांना हा टीझरही पसंत पडला आहे.

Story img Loader