Sam Bahadur Trailer: विकी कौशल आणि मेघना गुलजार यांचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. टीझर आणि पोस्टरनंतर आता नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते. भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे.

ट्रेलरमध्ये विकी कौशलने देहबोली, संवादफेक, फील्ड मार्शलच्या भूमिकेसाठीचा अॅटीट्यूड यावर प्रचंड मेहनत घेतल्याचं जाणवत आहे. सॅम माणेकशा यांच्या हालचालीपासून बोलण्याची लकब अगदी हुबेहूब विकीने पकडली आहे. विकीच्या करिअरमधील ही सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी विकीने घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा करायलाही सुरुवात केली आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
sonu nigam met a child fan beatboxing
Video : छोट्या चाहत्यासाठी रस्त्यात थांबला सोनू निगम, टॅलेंटचं कौतुक केलं अन्…; त्याच्या ‘या’ कृतीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”

आणखी वाचा : ‘आश्रम’मधील ‘बबिता’ अडकणार लग्नबंधनात; त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा, म्हणाली “पुढील वर्षी…”

या चित्रपटात सॅम माणेकशा यांचा भारतीय सैन्यातील एकूण प्रवास, त्यांची शिस्त, त्यांची देशभक्ती, १९७१ च्या दरम्यान भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांची कामगिरी अशा वेगवेगळ्या पैलूंचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे ते ट्रेलर पाहताना जाणवतं. याबरोबरच चित्रपटात सॅम यांचे खासगी कौटुंबिक आयुष्य, राजकीय नेत्यांशी त्यांचे असलेले मतभेद व त्यामुळे त्यांना झालेला त्रास या सगळ्यावरही चित्रपटात भाष्य केलं असल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे.

या चित्रपटात सॅम माणेकशा यांच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य करण्यात आलं असून तत्कालीन राजकीय परिस्थितिचंही अचूक चित्रण यात करण्यात आल्याचं ट्रेलरवरुन दिसत आहे. मेघना गुलजार हिने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विकी कौशलसह या चित्रपटात फातीमा सना शेख ही इंदिरा गांधींच्या भूमिकेत व सान्या मल्होत्रा ही सॅम माणेकशा यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

याबरोबरच नीरज काबी, मोहम्मद झीशान अयुब, आशिष विद्यार्थी यांसारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. गेली ७ वर्षं मेघना गुलजार या चित्रपटावर काम करत आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ही प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त मुकाबला पाहायला मिळणार आहे.