विकी कौशलचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. जरा हटके जरा बचके या चित्रपटाच्या यशानंतर विकीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी ओपनिंग करेल, याकडे लक्ष लागलं होतं. आकडेवारीनुसार पहिल्याच दिवशी चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली आहे.
“…तर आता माझ्या हातात एखादं बाळ असतं,” गौतमी पाटीलचं वक्तव्य; म्हणाली, “कोणत्याही मुलीला…”
सुरुवातीच्या अंदाजानुसार, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ने पहिल्या दिवशी १.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाकडे एकंदरीत प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे. पहिल्या दिवसाची कमाई बघता चित्रपटाला नुकसान होण्याची शक्यता आहे. यापूर्वीचा विकी व साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.४९ कोटी रुपये कमावले होते.
या चित्रपटात विकीने भजन कुमार नावाची भूमिका साकारली आहे. “या चित्रपटाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा चित्रपट संपल्यानंतर, प्रेक्षक त्यांच्या कुटुंबासह चेहऱ्यावर हास्य घेऊन त्यांच्या घरी परत जातील. मी पहिल्यांदा चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली तेव्हाही माझ्याही त्याच भावना होत्या,” असं विकी एका मुलाखतीत म्हणाला होता.