अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री सारा अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा प्रमोशनच्या निमित्ताने विकी कौशल नुकताच ठाण्यात आला होता. यावेळी त्यांनी ठाणेकरांची मराठीतून संवाद साधला. आता त्याचा या प्रमोशनदरम्यानचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंती पडला. त्यानंतर या चित्रपटातील पहिलं गाणंही विकीच्या वाढदिवसाच्या प्रदर्शित करण्यात आलं. तर सध्या विकी आणि सारा या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विकीने नुकतीच ठाण्यात हजेरी लावली.

आणखी वाचा : Video: रोमँटिक होत विकी कौशलने असं काही केलं की सारा अली खानने अभिनेत्याला थेट मारली लाथ, व्हिडीओ व्हायरल

तो प्रमोशनच्या निमित्ताने ठाण्यातील कोरम मॉलमध्ये आला होता. यावेळेचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. विकीला पाहण्यासाठी कोरम मॉलमध्ये त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तर विकी येताच चाहत्यांनी त्याला हात मिळवण्यासाठी, त्याची सही मिळवण्यासाठी, त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी केली. यावेळी विकीने दिलखुलासपणे चाहत्यांची गप्पा मारल्या. त्याच्या काही खास फॅन्सना स्टेजवर विकीच्या बाजूला उभं राहून त्याच्याशी संवाद साधण्याची संधी देखील मिळाली. यादरम्यान एक महिला तिच्या लहान मुलीला घेऊन स्टेजवर आली. तर त्यांच्याकडे पाहून विकी मराठीत म्हणाला, “काय कसं काय?” विकीच्या तोंडून मराठी शब्द ऐकताच चाहते आश्चर्यचकित झाले.

हेही वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत बोलू लागली, व्हिडीओ व्हायरल

विकीचा मराठी बोलतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर प्रतिक्रिया देत त्याच्या दिलखुलासपणाचं आणि त्याच्या मराठीतून बोलण्याचं सर्वजण कौतुक करत आहेत. विकी आणि साराचा ‘जरा हटके जरा बचके’ हा आगामी चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Story img Loader