बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिकांमुळे, तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे कलाकार मोठ्या चर्चेत असतात. आता बॉलीवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या नवीन चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहे. ‘बॅड न्यूज’ असे या नवीन चित्रपटाचे नाव असून, त्यातील ‘तौबा तौबा’ गाण्यामुळे तो चर्चेत आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विकी कौशलचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाणे चाहत्यांना ताल धरण्यासाठी भाग पाडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तृप्ती डिमरी या गाण्यात विकीला साथ देताना दिसत आहे. मात्र, विकीने आपल्या सहजसुंदर नृत्याद्वारे प्रेक्षकांना त्याच्यावर लक्ष खिळवून ठेवायला भाग पाडले आहे. सोशल मीडियावर आता विकीच्या या डान्सने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विकीचा हा डान्स पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना त्याची पत्नी व अभिनेत्री कतरिना कैफची आठवण झाली आहे. ‘धूम ३’मधील कतरिनाने ‘कमली’ गाण्यावर केलेला डान्स आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. या गाण्यावरील तिने केलेला डान्स हा सर्वोत्तम सादरीकरणांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. आता विकीचा तौबा तौबा या गाण्यावरील डान्स बघितल्यानंतर नेटकऱ्यांना कतरिनाच्या कमली या गाण्याची आठवण झाली आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विकीच्या नृत्यावरून अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे, “तुला सर्वोत्तम डान्सची शिक्षिका मिळाली आहे. करतरिनाने त्याला सगळे धडे व्यवस्थित शिकवले आहेत. विकीला असे नाचताना याआधी कधीही पाहिले नाही.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे, “तुला नाचताना पाहून असे वाटत आहे की, करतरिनाच डान्स करत आहे.” तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे, “विकीचा हा डान्स पाहिल्यानंतर कतरिनाला तिच्या नवऱ्याबाबत गर्व वाटला असेल.” अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी विकीचे कौतुक तर केलेच आहे; पण त्याचबरोबर त्याचा डान्स पाहताना कतरिनाच्या कमली, काला चश्मा या गाण्यांची प्रकर्षाने आठवण झाल्याचेदेखील नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विकीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटात कतरिना पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावताना दिसणार असल्याने खऱ्या आयुष्यातील या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. बॅड न्यूज या चित्रपटात विकी कौशलसह तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.