Mahavatar Movie Poster : विकी कौशल त्याच्या विविध भूमिकांमुळे ओळखला जातो. त्याने आजवर ‘उरी’ सिनेमातील सैन्य अधिकारी, सरदार उधम सिंग यांच्यावरील बायोपिक आणि ‘सॅम बहादूर’ या बायोपिक मध्ये आपल्या अभिनयानं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक भूमिकेसाठी, ते पात्र पडद्यावर हुबेहूब साकारण्यासाठी विकी कौशल जी मेहनत घेतो त्याबद्द्ल चाहते त्याचे नेहमीच कौतुक करतात. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तो ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांची भूमिका साकारणार असल्याचे समजले. हा ट्रेलर बघून त्याच्या समर्पण वृत्तीच कौतुक झाले होते.

‘छावा’ आणि ‘लव्ह अॅण्ड वॉर’सारख्या बहुप्रतीक्षित चित्रपटांसाठी विकीच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहेच; पण त्यात आता अजून एका भव्य प्रकल्पाची भर पडली आहे. आता विकी कौशलच्या ‘महाअवतार’ या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. त्यात विकी कौशल भगवान परशुरामाची (Bhagwan Parshuram) भूमिका साकारणार आहे.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Priyanka Chopra Marathi film Paani released on OTT
मराठी चित्रपट ‘पाणी’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला प्रदर्शित, प्रियांका चोप्राचे आहे खास कनेक्शन

हेही वाचा…सैफ अली खानने २१व्या वर्षी केले होते लग्न, आई-वडिलांनाही दिली नव्हती कल्पना; किस्सा सांगत म्हणालेला, “पहिलीच डेट आणि…”

विकी कौशलने (Vicky Kaushal) त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर या सिनेमाच पोस्टर शेअर केलं असून, तो यात हुबेहूब भगवान परशुराम यांच्यासारखा दिसत आहे. हा पोस्टर व्हायरल होत असून, चाहते त्यावर कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.

‘महाअवतार’च्या पोस्टरमध्ये विकी साधू अवतारात दिसतोय. त्यात त्याच्या दाढी-मिशा आणि केस वाढलेले दिसत असून, त्याच्या चेहऱ्यावर रागीट भाव दिसत आहेत. या सिनेमाच्या पोस्टरबरोबरच एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. त्यात विकी पाठमोरा दाखवला असून, त्याच्या पाठीमागे भगवान परशुराम यांचं ‘परशू’ हे हत्यार दिसत आहे. विकीच्या हातांना रुद्राक्ष बांधलेलं दिसून येत असून, विकीचा हा जबरदस्त अवतार चाहत्यांना भुरळ घालत आहे.

हेही वाचा…घटस्फोटानंतर चांगली जोडीदार होण्यासाठी सल्ला देणाऱ्या आमिर खानला किरण राव म्हणाली, “मी…”

चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

c

विकीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून, एका चाहत्याने लिहिलं, “काय कमाल लूक आहे. फक्त विकीच या भूमिकेला न्याय देऊ शकतो” तर आणखी एका चाहत्यानं लिहिलं, “इथं ‘छावा’चा फीवर उतरत नाहीये आणि तुम्ही हा ‘महाअवतार’ घेऊन आला आहात. आम्ही या सिनेमाची वाट बघतोय. लोक आपल्या इच्छांची बकेट लिस्ट बनवतात. आम्ही विकीच्या सिनेमांची बकेट लिस्ट तयार करीत आहोत… विकी तुला आगामी सर्व प्रकल्पांसाठी शुभेच्छा!

vicky kaushal fans commented on mahaavtar movie poster
विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर ‘महाअवतार’ सिनेमाच पोस्टर शेअर केलं असून विकीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Photo _ Vicky Kaushal Instagram)

‘महाअवतार’ या सिनेमाचं दिग्दर्शन ‘स्त्री’ आणि ‘स्त्री २’ फेम दिग्दर्शक अमर कौशिक करणार असून, दिनेश विजान या सिनेमाची निर्मिती करणार आहे. हा सिनेमा २०२६ च्या डिसेंबर महिन्यात ‘ख्रिसमस’ला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा…२३ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्रीने घेतली हॉलीवूड स्टार टॉम क्रूझची भेट, पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव, म्हणाले…

रिपोर्टनुसार या चित्रपटाचं प्री-प्रॉडक्शन जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. ‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाचं शूटिंग नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू होणार आहे. विकीचा आगामी ‘छावा’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी रिलीज होणार होता; परंतु अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाबरोबर टक्कर टाळण्यासाठी आता हा चित्रपट पुढे ढकलला आहे. या सिनेमाची नवीन रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.

हेही वाचा…भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक; एका गाण्यासाठी आकारतो तब्बल तीन कोटी! अरिजीत सिंह, सोनू निगम जवळपासही नाहीत

या चित्रपटाव्यतिरिक्त विकी ‘लव्ह अॅण्ड वॉर’ या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याबरोबर दिसणार आहे. ‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, भन्साळींनी नोव्हेंबर २०२४ मध्ये मुंबईत रणबीरसह चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

Story img Loader