छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)ने रायगडावर हजेरी लावली आहे. अभिनेत्याने तो रायगडावर जाणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. आता रायगडावर पोहोचल्यानंतर अभिनेत्याने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मी स्वत:ला भाग्यवान समजतो…

विकी कौशल नुकताच रायगडावर पोहोचला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना विकी कौशलने म्हटले, “मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला इथे येण्याची संधी मिळाली. सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा! इथे येण्याचे माझे स्वप्न होते. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळावी असे स्वप्न होते. आज त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर खूप छान वाटत आहे. मला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, हे मी माझे सौभाग्य समजतो. लोकांचे चित्रपटाला जे प्रेम मिळत आहे, त्यामुळे आनंद होत आहे. पण, हे जे आहे ते सगळं छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. आज मी शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन घरी जाईन, त्यामुळे मला समाधान वाटत आहे. याबरोबरच यावेळी त्याने चित्रपटातील एक डायलॉगही म्हटला. त्याने म्हटले, “शेर नहीं रहा पर छावा अभि भी जंगल में घूम रहा है, हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते है।”

अभिनेत्याला छावा चित्रपटात साकारताना केलेल्या मेहनतीविषयी विचारले. ज्या प्रकारे भूमिका साकारली आहे, ते पाहिल्यानंतर लोक रडत आहे. यावर त्याची प्रतिक्रिया विचारली. ज्या प्रकारे भूमिका साकारली आहे, ते पाहिल्यानंतर लोक रडत आहे. यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले, “ही भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. दिग्दर्शक, निर्माते या सर्वांनीच खूप मेहनत घेतली. पण, छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्या यातना सहन केल्यात, त्याच्या तुलनेत आम्ही केलेली मेहनत काहीच नाही. ही कहाणी लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे होते. महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण जगात छत्रपती संभाजी महाराजांची गोष्ट पोहोचणे गरजेचे होते. तसेच मला संभाजी महाराजांची भूमिका साकारताना खूप काही शिकायला मिळाले”, असे म्हणत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

अभिनेता विकी कौशलसह चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शकही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते.

Story img Loader