आज देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. मुंबईतील सर्व मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. मुंबईकर मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावत आहेत. मराठी व बॉलीवूड सेलिब्रिटीही मतदान करण्यासाठी जाताना दिसत आहेत. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग व दीपिका पादुकोण या दोघांनाही मतदानाचा हक्क बजावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर व दीपिका दोघांनी मुंबईत मतदान केलं दोघेही कारने मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीर व दीपिका पांढरे शर्ट व डेनिम पँट अशा लूकमध्ये मतदानासाठी आले होते. यावेळी दोघांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. या गर्दीतून वाट काढत रणवीरने गरोदर दीपिकाला कारपर्यंत पोहोचवलं.

तमन्ना भाटियाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, १७ दिवसांपासून करतोय तुफान कमाई; तुम्ही पाहिला का?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो व व्हिडीओंमध्ये दीपिका पदुकोणचा बेबी बंप पाहायला मिळतोय. अनेक पापाराझी अकाउंटवरून दीपिका व रणबीरचे हे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री सध्या शूटिंग आटोपून आराम करत आहे. अशातच ती मतदानासाठी घराबाहेर पडल्याचं दिसून आलं. दीपिका व रणवीर सेरोगसीद्वारे बाळाचं स्वागत करणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर खूप रंगल्या होत्या, मात्र दीपिकाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तीच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

“ते गडकिल्ले तुमच्या बापाचे नाहीत”, गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी; म्हणाले, “तुम्ही असले चाळे…”

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांनी २९ फेब्रुवारी २०२३ रोजी ते आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने ‘सप्टेंबर २०२४’ असं लिहिलं होतं. पोस्टमध्ये तिची व रणवीरची नावं होतं. या पोस्टमध्ये लहान बाळाचे कपडे व खेळण्यांचे चित्र होते. रणवीर व दीपिका दोघेही लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा होणार आहेत. दोघेही सप्टेंबर २०२४ मध्ये पहिल्या बाळाचं स्वागत करतील.

Video: “तू नाचलीस ना बास झालं…”, गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, “जरातरी लाजावं की…”

दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची ‘फायटर’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होता. दुसरीकडे रणवीर सिंगच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास तो अखेरचा २०२३ मध्ये ‘रॉकी औरी रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. सध्या रणवीर त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर दीपिकाने तिच्या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of deepika padukone baby bump ranveer singh holding hand after voting in mumbai hrc