प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता व निर्माता जॅकी भगनानीने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगशी लग्नगाठ बांधली. रकुल व जॅकीचं गोव्यात लग्न झालं. या लग्नाला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी होती. फक्त सिनेक्षेत्रातीलच नाही तर राजकीय क्षेत्रातील मंडळीदेखील या लग्नाला हजर होती.
रकुल प्रीत व जॅकी लग्नानंतर अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात जॅकी- रकुल दिपशिखा देखमुख व तिच्या मुलांबरोबर एका कार्यक्रमात दिसले. यावेळी त्या सर्वांनी एकत्र पोजही दिल्या. दिपशिखा ही जॅकीची सख्खी मोठी बहीण आहे. या व्हिडीओत रकुल नणंद दिपशिखा व तिच्या मुलांबरोबर प्रेमाने गप्पा मारताना दिसली. या व्हिडीओत रकुलचं नणंद व तिच्या मुलांशी खास बॉण्डिंग पाहायला मिळालं.
जॅकी भगनानी व रकुलने Ed Sheeran च्या कार्यक्रमाला मुंबईत हजेरी लावली. यावेळी आमदार धीरज देशमुख यांची पत्नी दिपशिखा देशमुखही तिच्या मुलांबरोबर या कार्यक्रमाला पोहोचली होती. त्यानंतर दिपशिखा, तिची मुलं, रकुल व जॅकी यांनी याठिकाणी एकत्र पोज दिल्या. रकुल नणंद व तिच्या मुलांबरोबर गप्पा मारताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. ‘फिल्मीग्यान’ ने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
जॅकी व रकुल २१ फेब्रुवारी रोजी गोव्यात लग्नबंधनात अडकले. हे दोघेही मागच्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी गोव्यात समुद्रकिनारी एका आलिशान रिसॉर्टमध्ये लग्नगाठ बांधली.