Kareena Kapoor Saif Ali Khan at Malaika Arora Home: अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचे निधन झाले. अनिल अरोरा यांनी आज (११ सप्टेंबरला) सकाळी ९ वाजता आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रेमध्ये ते एका इमारतीत सहाव्या मजल्यावर राहत होते. त्यांनी त्याच इमारतीतून उडी घेत आयुष्य संपवलं. ही घटना घडली तेव्हा मलायका अरोरा पुण्यात होती. मलायका मुंबईत परतली असून आता सिनेसृष्टीतील अनेक कलाकार तिच्या वडिलांच्या घरी पोहोचले आहेत.

अनिल अरोरा यांच्या निधनाबद्दल कळाल्यावर सर्वात आधी मलायका अरोराचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान घटनास्थळी पोहोचला होता. त्यानंतर त्याचे वडील सलीम खान, आई सलमा खान, त्याचा भाऊ सोहेल खान, त्याचा मुलगा निर्वाण हे सर्वजण पोहोचला. मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही तिथे आला. त्यानंतर मलायका अरोरा व तिची बहीण अमृता अरोरा दोघीही पोहोचल्या. आता मलायकाची बेस्ट फ्रेंड करीना कपूरही तिच्या घरी गेली आहे.

Video: मलायका अरोराच्या वडिलांच्या निधनाबद्दल मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; सुसाईड नोट सापडली का? म्हणाले, “अनिल अरोरा यांचा…”

करीना कपूर व तिचा पती सैफ अली खान दोघेही वांद्रे येथील अनिल अरोरांच्या घरी पोहोचले. करीना, करिष्मा कपूर या दोघी बहिणी तसेच मलायका अरोरा व तिची बहीण अमृता या चौघी खूप जवळच्या मैत्रिणी आहे. नुकत्याच त्या एकत्र पार्टी करताना दिसल्या होत्या. फिल्मिज्ञान व पल्लव पालीवाल नावाच्या अकाउंटवरून दोघांचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

Video: वडिलांच्या आत्महत्येबद्दल कळताच घरी परतली मलायका अरोरा; अर्जुन कपूर अन् अरबाज खानचे कुटुंबीयही पोहोचले

दरम्यान, अनिल अरोरांच्या निधनाबद्दल कळाल्यावर अनन्या पांडे, तिचे वडील चंकी पांडे, निर्माता रितेश सिधवानी, अरबाजची सावत्र आई हेलन हे त्यांच्या घरी पोहोचले आहेत.