Katrina Kaif Shirdi Visit Video: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘स्त्री २’ च्या यशानंतर शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेली होती. त्यानंतर आता बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या शिर्डी भेटीचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. कतरिना सासूबाईंबरोबर शिर्डीला साईचरणी नतमस्तक झाली. कतरिना व तिच्या सासूबाईंचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड अभिनेत्री आणि विकी कौशलची (Vicky Kaushal) पत्नी कतरिना कैफ सोमवारी तिच्या सासूबाई वीणा कौशल यांच्यासोबत शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शन घेतले. एका व्हिडीओमध्ये कतरिना मंदिरात आशीर्वाद घेताना दिसत आहे. कतरिना कैफ पांढऱ्या पारंपरिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. साईबाबा संस्थानने इन्स्टाग्रामवर या दोघींचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – मुकेश खन्ना यांचा शत्रुघ्न सिन्हांच्या संस्कारावर प्रश्न; भडकलेली सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “यापुढे काही बोलाल…”

पाहा व्हिडीओ –

कतरिनाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या सासूबाईंबरोबरचे अनेक फोटो पाहायला मिळतात. ती अनेकदा तिच्या सासूबाईंवरील प्रेम व्यक्त करत असते. शिर्डीत दर्शन करून कतरिना तिच्या सासूबाईंबरोबर मुंबईला परत आली. दोघींचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कतरिना सासूबाईंना मिठी मारताना आणि कपाळावर किस करताना दिसत आहे.

हेही वाचा – दिसण्याबद्दल विनोद करणाऱ्या कपिल शर्माला ॲटली कुमारने दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाला, “मी कसा दिसतो…”

कतरिना कैफच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची विजय सेतुपतीबरोबर श्रीराम राघवनच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कामगिरी केली होती. कतरिनाने अद्याप तिच्या पुढील चित्रपटाची घोषणा केलेली नाही.

हेही वाचा – एसीमुळे बोकड शिंकलं, त्याच्या छातीला बाम लावला अन्…; नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा, म्हणाले, “पुण्यात येऊन…”

कतरिनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिच्या व विकी कौशलच्या लग्नाला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघेही त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी राजस्थानला गेले होते. राजस्थान ट्रिपमधील काही सुंदर फोटो कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of katrina kaif shirdi visit with mother in law actress showers love on veena kaushal hrc