अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंगचा पहिला दिवस आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाने गाजवला. तर, दुसऱ्या दिवशी बॉलीवूडकरांची व खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळाली. शनिवारी रात्री अनेक अभिनेते व अभिनेत्री अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये मंचावर थिरकले. त्याचे काही इनसाइड व्हिडीओ समोर आले आहेत.

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात दीपिका पदुकोण व रणवीर सिंग, नीता अंबानी व इशा अंबानीसह अनेकांनी डान्स केला. या कार्यक्रमात लक्ष वेधून घेतलं ते बॉलीवूडच्या तिन्ही खाननी. सलमान खान, शाहरुख खान आमिर खान हे तिघेही एकाच मंचावर एकत्र नाचले. तिघांनी एकमेकांच्या सिग्नेचर स्टेपही केल्या.

रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म

तिघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते सलमान खानच्या ‘मुझसे शादी करोगी’ सिनेमातील टॉवेल स्टेप करताना दिसतात. नंतर ते आमिर व शाहरुखची सिग्नेचर स्टेप रिक्रिएट करतात. आमिर, सलमान व शाहरुख या तिघांचाही डान्स पाहून उपस्थित टाळ्या वाजवत होते. तिघांनी तिथे असलेल्या पाहुण्यांचं खूप मनोरंजन केलं.

“राधिका माझ्या स्वप्नातील राणी,” अनंत अंबानींचे होणाऱ्या पत्नीबाबत विधान; वाढलेल्या वजनाबद्दलही केलं भाष्य

हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. ‘जे कोणत्याच निर्मात्याला जमलं नाही ते अंबानींनी करून दाखवलं, या तिन्ही खानना एकत्र आणलं’, ‘यांच्या डान्सशिवाय अंबानींचं लग्न अपूर्ण आहे’, ‘तिन्ही स्टार्स आहेत आणि त्यांची तुलनाच होऊ शकत नाही,’ ‘बॉलीवूडचे तीन स्तंभ,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

Story img Loader