सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योद्धा’ चित्रपट आज (१५ मार्च रोजी) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग गुरुवारी ठेवण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. इतकंच नाही तर सिद्धार्थ व त्याची पत्नी कियाराच्या आई-वडिलांनीही हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील फोटो व व्हिडीओंची चर्चा आहे.

‘योद्धा’ च्या स्क्रीनिंमधून काही व्हिडीओ समोर आले आहे. पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आलेले सिद्धार्थचे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ व्हीलचेअरवर बसलेल्या वडिलांची काळजी घेताना दिसत आहे. हे व्हिडीओ पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत, तसेच व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा ​​मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते. सुनील व त्यांची पत्नी रिमा त्यांचा मोठा मुलगा व सिद्धार्थचा मोठा भाऊ हर्षदबरोबर दिल्लीमध्ये राहतात. तर, सिद्धार्थ व कियारा कामानिमित्त मुंबईत असतात.

प्रियांका चोप्राची बहीण झाली केजरीवालांची सून! मीराने ४० व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली…

‘पालकांशी असं वागायचं असतं, आम्हाला प्रेरणा देण्यासाठी धन्यवाद,’ ‘प्रत्येक वडिलांना असाच मुलगा हवा असतो,’ ‘आज मी इंटरनेटवर पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट,’ ‘सिद्धार्थच्या वागण्यावरून त्याच्या आई-वडिलांनी दिलेले चांगले संस्कार दिसतात,’ ‘सिद्धार्थ खूप चांगला मुलगा आहे,’ अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओवर केल्या आहेत.

sidharth malhotra caring son
सिद्धार्थ मल्होत्राच्या व्हिडीओवरील कमेंट्स

सिद्धार्थच्या ‘योद्धा’ चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास यात त्याच्याबरोबर राशी खन्ना व दिशा पाटनी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन सागर आंबरे व पुष्कर ओझा यांनी केलं आहे. हा देशभक्तीपर चित्रपट आहे. ‘इंडीयन पोलीस फोर्स’ या सीरिजनंतर सिद्धार्थ पुन्हा एकदा देशभक्तीपर भूमिका साकारताना या चित्रपटात दिसणार आहे.